मराठी बातम्या /बातम्या /Viral /

महिलेच्या घरातील भिंतीतून बाहेर पडू लागलं रक्त, प्लंबरला बोलावताच समोर आलं धक्कादायक रहस्य

महिलेच्या घरातील भिंतीतून बाहेर पडू लागलं रक्त, प्लंबरला बोलावताच समोर आलं धक्कादायक रहस्य

प्लंबरमुळे सत्य उघड

प्लंबरमुळे सत्य उघड

या महिलेच्या घरांच्या भिंतीमधून अचानक रक्त येऊ लागलं, जे पाहून या घरामध्ये भीतीचे वातावरण निर्णाण झालं, अखेर महिलेसमोर याचं सत्य उघड झालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 26 सप्टेंबर : आपण कितीही घराला चांगल्यापद्धतीने ठेवलं तरी कालांतराने त्याला देखील रिपेअर करावं लागतं किंवा त्याचा मेंटेनन्स येतो. कारण कोणतीही गोष्ट असू देत काही काळाने ती खराब होणारच. तसेच घराचं बांधकाम चांगलं नसेल, तरी देखील बऱ्याचदा लोकांना भिंती ओल्या होणं, त्याला बुरशी लागनं, नळ खराब होणं, अशा लहान मोठ्या समस्या उद्भवतात. परंतू एका महिलेसोबत असा प्रकार घडला आहे. जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

हो, कारण या महिलेच्या घरांच्या भिंतीमधून अचानक रक्त येऊ लागलं, जे पाहून या घरामध्ये भीतीचे वातावरण निर्णाण झाले. हे प्रकरण अमेरिकेतील आहे, पण या बातमीनंतर लोकांमध्ये उत्सुक्ता तसेच भय अशा मिश्र प्रतिक्रिया आहेत.

हे वाचा : समुद्रात सापडले जहाजाचे अवशेष, तर मडक्यांमध्ये सापडल्या अशा वस्तू, आता 'या' रहस्यमयी गोष्टींची होतेय चर्चा

'मिरर यूके'च्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, लेक्सी असे या महिलेचे नाव आहे आणि तिच्या घरातून ही घटना समोर आली आहे. तिला अचानक तिच्या बाथरुममध्ये दिसले की रक्तासारखे काहीतरी बाहेर येत होतं. सुरुवातीला तिला धक्का बसला आणि ती घाबरली आणि त्यानंतर ती बाथरुममध्ये आत गेली नाही. यानंतर तिने आपल्या शेजाऱ्याला देखील ते पाहाण्यासाठी बोलावले, परंतू त्याला देखील हे सगळं प्रकरण लक्षात आलं नाही.

मग या महिलेच्या शेजाऱ्याने तिला सल्ला दिला की, प्लंबरला बोलवा, मगच कळेल की ते रक्त आहे की आणखी काही. अखेर महिलेने आणि शेजाऱ्याने मिळून प्लंबरला बोलावले.

महिलेच्या घरातील भिंतीतून येऊ लागलं रक्त

हे वाचा : महाराष्ट्रातील 'या' गावात दररोज ९० मिनिटे कोणीही वापरत नाही फोन, आश्चर्यचकित करेल यामाचं कारण

प्लंबर जेव्हा या भिंतीजवळ गेला, तेव्हा त्याने आधी नीट भिंत पाहिली आणि त्याच्या वरचा थर काढायला सुरुवात केली. मात्र, त्याने थोडावेळ हलका थर काढला तरी आतून काहीच बाहेर आले नाही.

ज्यानंतर प्लंबरच्या हे लक्षात आले की, ते रक्त नाही, तर तेथील ग्रीप आणि पाईपच्या बाजूला लागलेली गंज, पाण्यासोबत लाल रंगाच्या स्वरुपात खाली वाहत आली. हे ऐकताच महिलेनं सुटकेचा श्वास सोडला.

या भितींच्या रहस्याबद्दल महिलेला आधी वाटत होते की, या भिंतीमागे एखादं भुत असावं किंवा कोणाची तरी डेड बॉडी असावी, पण असं काही ते म

जेव्हा प्लंबरने त्याला सांगितले की ते रक्त नव्हते, तर फ्ल्यूमधील गंज पाण्याबरोबर जाड लाल रंगाच्या स्वरूपात खाली वाहत होता. यानंतर फिओरमध्ये जाऊन महिलेला दिलासा मिळाला. नाहीतर बाई पण म्हणत होत्या कि भिंतीत भूत असू शकते. आता त्याचे रहस्य समोर आले आहे.

First published:

Tags: Shocking news, Top trending, Viral news