मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चिकन खाऊन प्राणीसंग्रहालयात जाणं पडलं महागात; सापानं चिमुकलीच्या गालाची केली वाईट अवस्था

चिकन खाऊन प्राणीसंग्रहालयात जाणं पडलं महागात; सापानं चिमुकलीच्या गालाची केली वाईट अवस्था

पेटिंग झूमध्ये जेव्हा या चिमुकलीनं सापाला आपल्याजवळ ठेवलं होतं, तेव्हाच सापानं तिच्या चेहऱ्यावर चावा केला.

पेटिंग झूमध्ये जेव्हा या चिमुकलीनं सापाला आपल्याजवळ ठेवलं होतं, तेव्हाच सापानं तिच्या चेहऱ्यावर चावा केला.

पेटिंग झूमध्ये जेव्हा या चिमुकलीनं सापाला आपल्याजवळ ठेवलं होतं, तेव्हाच सापानं तिच्या चेहऱ्यावर चावा केला.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 03 सप्टेंबर : लहान मुलांना प्राण्यांसोबत फ्रेंडली बनवण्यासाठी आणि त्या भोजन खाऊ घालण्यासाठी बनवण्यात आलेल्या पेटिंग झूमध्ये (Petting Zoo) गेलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीला भयंकर अनुभव आला. आता ही चिमुकली याठिकाणी जाण्याआधी किती तरी वेळा विचार करेल. यासोबतच आता ती एखाद्या प्राण्यासोबत खेळण्याआधीही त्याबद्दलचा प्रचंड अभ्यास करेल. कारण पेटिंग झूमध्ये जेव्हा या चिमुकलीनं सापाला आपल्याजवळ ठेवलं होतं, तेव्हाच सापानं तिच्या चेहऱ्यावर चावा (Snake Attack on Small Girl) केला.

रस्त्यावरच आऊट ऑफ कंट्रोल झाले नवरी-नवरदेव; विचित्र डान्सचा VIDEO व्हायरल

न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या येकातेरिनबर्गमध्ये 5 वर्षीय विक्‍टोरिया आपल्या आईसोबत बटरफ्लाई पार्क पेटिंग झूमध्ये गेली होती. तिथल्या स्टाफनं एक छोटासा पांढऱ्या रंगाचा साप विक्टोरियाच्या गळ्यात ठेवला. विक्टोरिया थोडी घाबरली आणि यानंतर त्याच सापानं तिच्या गालावरच चावा केला. स्टाफमधील लोकांनी लगेचच चिमुकलीच्या गळ्यातून हा साप बाजूला काढला. सुदैवानं हा साप अतिशय कमी विषारी असल्यानं चिमुकलीवर याचा फार काही परिणाम झाला नाही. यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं.

महिला वेटरच्या सौंदर्यावर फिदा झालेल्यानं दिली मोठी टीप, नोट वाचताच हादरली तरुणी

या घटनेबाबत बोलताना झूमधील कर्मचाऱ्यांनी सांगितलं, की साप कधीही कोणावर या पद्धतीनं हल्ला करत नाही आणि याआधी अशा घटना कधी घडल्याही नाहीत. तर, साप विशेषतज्ञ एकातेरिना उवरोवा यांनी सांगितलं, की साप वासाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असतात. कदाचित साप या मुलीच्या चेहऱ्याचा वास घेण्याचा प्रयत्न करत होता आणि याच प्रयत्नात त्यानं लचका तोडला. कारण या मुलीनं झूमध्ये येण्याआधी चिकन खाल्लं होतं. जर साप भुकेला असेल आणि त्याला आपल्या शिकारीचा वास आला तर तो अशा प्रकारे हल्ला करू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

यासोबतच भरपूर जणांनी हात लावल्यानं तसंच विश्रांतीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्यानं सापानं हा हल्ला केला असल्याचीही शक्यता आहे.

First published:

Tags: Snake, Viral news