लंडन 03 सप्टेंबर : अनेक लोक जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) जातात तेव्हा वेटरला काहीतरी टीप देतात. मात्र, तुम्ही असं कधी ऐकलंय का की एखाद्या व्यक्तीनं जेवणाच्या बिलापेक्षा जास्त टीप वेटरला दिली आणि बिलावर एक खास मेसेजही लिहिला (Tip For Waitress) . मात्र, ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. एका ग्राहकानं महिला वेटरला 750 यूरो म्हणजेच तब्बल 65 हजार 117 रुपये टीप म्हणून दिले आणि बिलवर एक खास नोट (Special Note For Waitress) लिहिली. प्रेमात धोका दिलेल्या BF ला तरुणीकडून शिक्षा; आता एकदा बोलण्यासाठी घेते 20 हजार मिररमध्ये आलेल्या वृत्तानुसार, रेस्टॉरंटमध्ये आलेल्या गेस्टनं बिलवर (Restaurant Bill) लिहिलेली नोट वाचून सगळेच हैराण झाले. ग्राहकानं रेस्टॉरंटच्या बिलपेक्षा 8 पट रक्कम या महिला वेटरला टीप म्हणून दिली होती. महिला वेटरनं सांगितलं, या ग्राहकाचं बिल 93.45 यूरो म्हणजेच जवळपास 8 हजार 110 रुपये इतकं होतं. मात्र, त्यानं बिलासोबच 65 हजार 117 रुपये वाढवा दिले. महिला वेटरला विश्वास बसत नव्हता की टीप म्हणून तिला इतके जास्त पैसे मिळाले आहेत. VIDEO: मंडपातच चढला नवरीचा पारा; पुढे जे केलं ते पाहून पाहुणेही थक्क या ग्राहकानं रेस्टॉरंटच्या बिलावर महिला वेटरच्या सुंदरतेचं कौतुक करत काही ओळी लिहिल्या होत्या. ग्राहकानं लिहिलं होतं, की तू अतिशय सुंदर आहेस. मला कॉल कर. इतकंच नाही तर त्या व्यक्तीनं बिलवर आपला नंबरही लिहिला होता. हे वाचून महिला वेटर घाबरली. यानंतर तिनं या बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावर अनेकांनी निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. काहींनी म्हटलं, की मला असा मेसेज मिळाला असता, तर खूप वाईट वाटलं असतं. आणखी एकानं लिहिलं, की बिचारी मुलगी. हे पाहून मला मरण्याची इच्छा होतीये. आणखी एकानं लिहिलं, की इतकी जास्त टीप देणं हे त्या व्यक्तीचं केवळ नाटक होतं, त्याला महिलेला आपल्या जाळ्यात अडकवायचं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.