जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रस्त्यावरच आऊट ऑफ कंट्रोल झाले नवरी-नवरदेव; विचित्र डान्सचा VIDEO व्हायरल

रस्त्यावरच आऊट ऑफ कंट्रोल झाले नवरी-नवरदेव; विचित्र डान्सचा VIDEO व्हायरल

रस्त्यावरच आऊट ऑफ कंट्रोल झाले नवरी-नवरदेव; विचित्र डान्सचा VIDEO व्हायरल

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एक वेडिंग व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव रस्त्यावर विचित्र डान्स (Weird Dance of Groom) करताना दिसतो

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 03 सप्टेंबर : काही लोकांना डान्स (Dance) करण्याची प्रचंड आवड असते. ते कुठेही थिरकायला सुरुवात करतात. त्यांना कोणत्याच गोष्टीची कसलीही पर्वा नसते. सोशल मीडियावर सध्या अशाच एका लग्नातील व्हिडिओ (Wedding Video) व्हायरल होत आहे. या वेडिंग व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव रस्त्यारवरच डान्स (Bride Groom Dance Video) करताना दिसत आहेत. त्यांना एकमेकांच्या कंपनीशिवाय इतर कोणत्याही गोष्टीची पर्वा नाहीये. VIDEO: मंडपातच चढला नवरीचा पारा; पुढे जे केलं ते पाहून पाहुणेही थक्क सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एक वेडिंग व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव रस्त्यावर विचित्र डान्स (Weird Dance of Groom) करताना दिसतो. नवरदेवाच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे. त्याच्या शेजारीच काही मित्र आणि नातेवाईकही उभा आहेत. जे त्याचा उत्साह वाढवत आहेत. नवरदेव आपल्याच तालात नाचताना दिसत आहे.

जाहिरात

प्रेमात धोका दिलेल्या BF ला तरुणीकडून शिक्षा; आता एकदा बोलण्यासाठी घेते 20 हजार नवरदेव डान्स करत असतानाच नवरी समोर येते. पांढऱ्या लेहंग्यामध्ये दिसणारी ही नवरीदेखील डान्सच्या बाबतीत नवरदेवापेक्षा कमी नाही. समोर येऊन आधी तिनं आपल्या पायातील चप्पल काढली आणि नंतर तिनंदेखील नवरदेवाला टक्कर देत रस्त्यावरच अजब डान्स सुरू केला. दोघांच्या डान्स स्टेप पाहून कोणालाही हसू येईल. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात