मराठी बातम्या /बातम्या /Viral /अडचणीत असलेल्या महिलेनं Emergency नंबरवर फोन करून मागवला पिझ्झा; ऑपरेटरला लगेच समजला इशारा अन्...

अडचणीत असलेल्या महिलेनं Emergency नंबरवर फोन करून मागवला पिझ्झा; ऑपरेटरला लगेच समजला इशारा अन्...

अनेकवेळा असं घडतं की एखाद्या व्यक्तीला धोका असतो आणि तो आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून आपली समस्या सांगतो. मात्र आपण अडचणीत आहोत, हे सांगण्याचीही आपल्याला संधी मिळाली नाही तर?

अनेकवेळा असं घडतं की एखाद्या व्यक्तीला धोका असतो आणि तो आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून आपली समस्या सांगतो. मात्र आपण अडचणीत आहोत, हे सांगण्याचीही आपल्याला संधी मिळाली नाही तर?

अनेकवेळा असं घडतं की एखाद्या व्यक्तीला धोका असतो आणि तो आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून आपली समस्या सांगतो. मात्र आपण अडचणीत आहोत, हे सांगण्याचीही आपल्याला संधी मिळाली नाही तर?

नवी दिल्ली 08 एप्रिल : इमर्जन्सी नंबरवर कॉल करणारी व्यक्ती अडचणीत असल्याची शक्यता असते. मात्र एखाद्या व्यक्तीने इमर्जन्सी नंबरवर (Emergency Number) फोन करून पिझ्झा-बर्गर मागवायला सुरुवात केली तर? निश्चितच ऑपरेटर रागवेल. . मात्र एका ब्रिटीश आपत्कालीन सेवा ऑपरेटरला अशाच एका प्रकरणात महिलेचा राग आला नाही तर त्याने अगदी सामंजस्याने तिची समस्या समजून घेतली.

कपलने FB वर शेअर केला अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घराचा फोटो; नेटकऱ्यांना दिसलं भीतीदायक दृश्य

अनेकवेळा असं घडतं की एखाद्या व्यक्तीला धोका असतो आणि तो आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून आपली समस्या सांगतो. मात्र आपण अडचणीत आहोत, हे सांगण्याचीही आपल्याला संधी मिळाली नाही तर? ब्रिटनमधील एका महिलेसोबत असंच घडलं आणि तिने इमर्जन्सी नंबरवर फोन लावला. यानंतर ती पिझ्झा ऑर्डर करू लागली (Woman Orders Pizza on Emergency Number).

ही घटना नॉर्थ यॉर्कशायर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहे. त्यांनी सांगितलं की त्यांना एका मुलीचा फोन आला आणि ती पिझ्झा डिलिव्हरी कंपनीशी बोलत असल्यासारखं वागत होती. फोन अटेंड करणार्‍या ऑपरेटरला काही सेकंदातच तिचं बोलणं समजलं आणि त्यांनी मुलीला फक्त होय किंवा नाही, असं उत्तर देण्यास सांगितलं. सगळ्यात आधी ऑपरेटरने तिला प्रश्न विचारला की, तू कुठल्या अडचणीत आहेत का? या मुलीने हा असं उत्तर दिल्यानंतर ऑपरेटरला लगेच समजलं की जवळच बसलेल्या एखाद्या व्यक्तीपासून तिला धोका आहे.

अरेरे काय हे! नवरदेवाशेजारी बसून मित्राचे नको ते चाळे; कॅमेऱ्यात कैद झालं दृश्य; VIDEO VIRAL

जोपर्यंत महिला बोलत होती, तोपर्यंत पोलिसांनी ऑनलाईन ट्रॅकरचा वापर करून ही मुलगी प्रवास करत असलेल्या बसचा शोध घेतला आणि एक टीम त्या दिशेने रवाना झाली. यानंतर ज्या ४० वर्षीय व्यक्तीपासून या मुलीला धोका होता, त्याला अटक करण्यात आली. नंतर पोलिसांनी या व्यक्तीला सोडून दिलं आणि महिलेला सुरक्षितपणे घरी पोहोचवलं. नॉर्थ यॉर्कशायर पोलिसांनी ही घटना ट्विटरवर शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, 'पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी आलेला फोन मदतीची मागणी करणारा असू शकतो'.

First published:
top videos

    Tags: Pizza, Viral news