जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कपलने FB वर शेअर केला अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घराचा फोटो; नेटकऱ्यांना दिसलं भीतीदायक दृश्य

कपलने FB वर शेअर केला अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घराचा फोटो; नेटकऱ्यांना दिसलं भीतीदायक दृश्य

कपलने FB वर शेअर केला अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घराचा फोटो; नेटकऱ्यांना दिसलं भीतीदायक दृश्य

या जोडप्याने शेअर केलेल्या एका फोटोनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं. यामध्ये लोकांना कचऱ्याच्या मधोमध एक हात दिसला. अनेक वर्षे या घरात कोणीही गेलं नव्हतं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 एप्रिल : आजकाल सोशल मीडियावर ब्लॉगर्स आणि एक्सप्लोरर्सचा अक्षरशः पूर आला आहे. हे लोक नवीन आणि अनोख्या गोष्टी लोकांसमोर मांडतात. फूड ब्लॉगर्सना सध्या भारतात खूप मागणी आहे, पण अर्बन एक्सप्लोरर्स परदेशातही खूप प्रसिद्ध झाले आहेत. अलीकडेच, एका अर्बन एक्सप्लोरर (Urban Explorers) जोडप्याने त्यांच्यासोबतचा एक विचित्र प्रसंग (Weird Experience) सोशल मीडियावर शेअर (Post on Social Media) केला. या जोडप्याने वर्षानुवर्षे बंद असलेल्या उद्धवस्त घराचा फोटो काढला होता आणि तो ऑनलाइन शेअर केला होता. पण लोकांची नजर यातील एका भितीदायक गोष्टीवर पडली. हातपाय बिलकुल हलवू शकत नव्हता; पण नर्सने असं काही केलं की अंथरूणातच नाचू लागला तरुण रुग्ण ‘The Urbexcr’ नावाच्या फेसबुक ग्रुपवर अनेक एक्सप्लोरर्स त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. यामध्ये वर्षानुवर्षे बंद असलेल्या घरांचे फोटो, इमारतींचे फोटो शेअर केले जातात. इतक्या वर्षांत आत काय घडलं, ते लोकांना दाखवलं जातं. मात्र नुकतंच वर्षानुवर्षे बंद असलेल्या घराचं छायाचित्र शेअर झाल्यावर लोकांच्या नजरा अशा गोष्टीवर पडल्या की एकच खळबळ उडाली. यानंतर एक्सप्लोरर दाम्पत्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि त्यांना याठिकाणी घेऊन गेले.

News18

या जोडप्याने शेअर केलेल्या एका फोटोनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं. यामध्ये लोकांना कचऱ्याच्या मधोमध एक हात दिसला. अनेक वर्षे या घरात कोणीही गेलं नव्हतं. अशा परिस्थितीत खोलीत हात दिसल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्यासाठी ही खूप भीतीदायक गोष्ट होती. या जोडप्याने फोटो शेअर करताना लोकेशन सांगितलेलं नव्हतं. अशा परिस्थितीत लोकांनी फोटोच्या कमेंटमध्ये या हाताकडे जोडप्याचं लक्ष वेधलं. 15 वर्षांपासून महिलेच्या पाठीमध्ये अडकलेली बंदुकीची गोळी; अखेर दीड दशकानंतर झाला त्या घटनेचा खुलासा या प्रकरणाबाबत जोडप्याने सांगितलं की, त्यांनी हे फोटो रात्री पोस्ट केले होते. त्यानंतर त्यांना झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांच्या फोनमध्ये अनेक नोटिफीकेशन आणि कमेंट आल्या तेव्हा त्यांना या फोटोमधील हात दिसला. यानंतर जोडप्याने ताबडतोब पोलिसांना बोलावलं. पोलिसांना घेऊन ते पुन्हा त्याठिकाणी गेले. तिथल्या खोलीत तो हात अजूनही दिसत होता. कचऱ्यातून त्याला बाहेर काढले असता समजलं, की प्रत्यक्षात ते एका मॅगझिनचं पान आहे. नंतर हे पाहून सगळ्यांनाच हसू आलं. मात्र सुरुवातीला हे दृश्य पाहून सगळेच अवाक झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात