Home /News /viral /

अरेरे काय हे! नवरदेवाशेजारी बसून मित्राचे नको ते चाळे; कॅमेऱ्यात कैद झालं दृश्य; VIDEO VIRAL

अरेरे काय हे! नवरदेवाशेजारी बसून मित्राचे नको ते चाळे; कॅमेऱ्यात कैद झालं दृश्य; VIDEO VIRAL

नवरदेवाजवळ बसलेल्या मित्राने असं काही केलं की पाहून तुम्ही शॉक व्हाल.

  मुंबई, 04 एप्रिल : लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात (Wedding video). काही व्हिडीओ मजेशीर तर काही भावुक असतात. काही व्हिडीओत नवरा-नवरी इमोशनल होऊन रडताना दिसतात. तर काही व्हिडीओत नवरा-नवरीसह मित्रमैत्रिणी मजा करताना दिसतात. काही व्हिडीओत नवरदेवाच्या मेहुणी त्याच्यासोबत मस्करी करताना दिसतात. पण सध्या असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्ही शॉक व्हाल (Friend stole money from groom note garland) . एरवी नवरदेवाच्या मित्राला काहीतरी विचित्र गिफ्ट देताना किंवा नवरदेवाला मुद्दामहून त्रास देताना तुम्ही पाहिलं असेल. पण आता नवरदेवाचा मित्र असं काही करताना दिसला ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. नवरदेव आणि सर्वांच्या नकळत मित्राने गुपचूपपणे असं काही केलं की तुम्ही पाहतच राहाल. व्हिडीओत पाहू शकता. यात नवरदेव बसलेला दिसतो आहे. त्याच्या आजूबाजूला त्याचं कुटुंब, त्याचे नातेवाईक, मित्र परिवार आहे. नवरदेवाच्या गळ्यात पैशांच्या नोटांचा हार घातलेला आहे. त्याच्या शेजारी बसलेल्या त्याच्या मित्राचा डोळा याच नोटांच्या हारावर आहे. हे वाचा - फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेले अन् तिथेच जुंपली; नवरी-नवरदेवासमोरच तुफान हाणामारी, VIDEO VIRAL नवरदेवासह सर्वांचं लक्ष दुसऱ्याच ठिकाणी आहे. त्यावेळी नवरदेवाशेजारी बसलेला मित्र संधी साधतो. त्याचा हात गुपचूप त्या नवरदेवाच्या गळ्यातील नोटांच्या हाराकडे जातो. तो नोट चोरण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात नवरदेवाचं त्याच्याकडे लक्ष जातं. तसा तो थोडा घाबरतो आणि आपला हात मागे घेतो. नवरदेव पुन्हा दुसरीकडे बघतो. तसा तो मित्र पुन्हा नोटांजवळ हात नेत. त्यातील काही नोटा काढतो आणि गुपचूप आपल्या खिशात टाकतो.
  View this post on Instagram

  A post shared by Meemlogy (@meemlogy)

  मित्राने आपल्या हारातील नोट काढली आहे, हे नवरदेवाला समजतही नाही. आपल्याला कुणीच पाहत नाही, असा समज मात्र या मित्राचा झाला. पण कुणीतरी त्याला असं करताना पाहतं आहे आणि व्हिडीओ बनवतं आहे. हे त्याला माहिती नव्हतं. कुणीतरी त्याचा हा व्हिडीओ गुपचूप शूट केला. जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हे वाचा - ब्युटी प्रोडक्टऐवजी 'त्या' Men Products च्या जाहिरातीसाठी उतावळी महिला; धक्कादायक आहे कारण meemlogy नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता हेच पैसे गिफ्ट करणार, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या