मराठी बातम्या /बातम्या /Viral /स्मार्ट कुत्रा! तोंडात बास्केट घेऊन बाजारात पोहोचला; स्वतः खरेदी केल्या भाज्या, VIDEO पाहून व्हाल चकित

स्मार्ट कुत्रा! तोंडात बास्केट घेऊन बाजारात पोहोचला; स्वतः खरेदी केल्या भाज्या, VIDEO पाहून व्हाल चकित

व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेने जमिनीवर भाजीचं दुकान थाटलेलं दिसत आहे. तेवढ्यात एक कुत्रा टोपली घेऊन तिथे पोहोचतो. मग कोणती भाजी घ्यायची आहे ते पायाने सांगतो.

व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेने जमिनीवर भाजीचं दुकान थाटलेलं दिसत आहे. तेवढ्यात एक कुत्रा टोपली घेऊन तिथे पोहोचतो. मग कोणती भाजी घ्यायची आहे ते पायाने सांगतो.

व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेने जमिनीवर भाजीचं दुकान थाटलेलं दिसत आहे. तेवढ्यात एक कुत्रा टोपली घेऊन तिथे पोहोचतो. मग कोणती भाजी घ्यायची आहे ते पायाने सांगतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 31 मार्च : असं म्हणतात की कुत्रा हा माणसाचा चांगला मित्र असतो. ही फक्त म्हणण्याची गोष्ट नाही, तर हे खरं असल्याचा प्रत्ययही आपल्याला अनेकदा येतो. कुत्र्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची माणसांबद्दल असलेली ओढ हे दोन्ही त्याला अगदी योग्य बनवतात. लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना खूप प्रशिक्षण देतात, ज्यामुळे त्यांना त्यांचे शब्दही सहज समजू लागतात. पण तुम्ही असा प्रशिक्षित कुत्रा कधी पाहिला आहे का की, जो स्वतः बाजारात जाऊन त्याच्या मालकासाठी भाजी खरेदी करतो? सध्या अशाच एका कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कृष्णवेडी मुस्लिम महिला; कान्हाच्या प्रेमात असं काही केलं की VIDEO तुफान VIRAL

@buitengebieden या ट्विटर अकाऊंटवर अनेकदा प्राण्यांचे आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक कुत्रा शॉपिंग करताना दिसत आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पहायला मिळतात, ज्यामध्ये श्वान त्यांच्या तोंडात वर्तमानपत्र किंवा वस्तू पकडतात आणि त्या त्याच्या मालकाकडे नेतात. मात्र एखाद्या श्वानाने खरेदी करणं ही खरोखरच कौतुकाची बाब आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही या श्वानाचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेने जमिनीवर भाजीचं दुकान थाटलेलं दिसत आहे. तेवढ्यात एक कुत्रा टोपली घेऊन तिथे पोहोचतो. मग कोणती भाजी घ्यायची आहे ते पायाने सांगतो. तो गोल आकाराच्या फळाकडे पाय दाखवतो आणि एक एक करून ती महिला त्याला टोपलीत ही फळं ठेवते. शेवटी ती महिला त्याच्या टोपलीत उरलेले पैसे ठेवते आणि तो ते घेऊन निघून जातो.

पुणेकरांनी कुत्र्यालाही घातलं हेल्मेट, अनोखी शक्कल लढवत केली जनजागृती

ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला 10 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 48 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं, की देवाने श्वान बनवले आहेत, जेणेकरून ते आपल्याला रोज आनंद देऊ शकतील. एकाने म्हटलं, की हा त्याने पाहिलेला जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. आणखी एकाने म्हटलं, की कुत्रा खूप हुशार आहे.

First published:
top videos

    Tags: Dog, Videos viral