मराठी बातम्या /बातम्या /Viral /कृष्णवेडी मुस्लिम महिला; कान्हाच्या प्रेमात असं काही केलं की VIDEO तुफान VIRAL

कृष्णवेडी मुस्लिम महिला; कान्हाच्या प्रेमात असं काही केलं की VIDEO तुफान VIRAL

रमजानच्या पूर्वसंध्येला मुस्लिम महिलेने कृष्णभक्तीत असं काही केलं की व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रमजानच्या पूर्वसंध्येला मुस्लिम महिलेने कृष्णभक्तीत असं काही केलं की व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रमजानच्या पूर्वसंध्येला मुस्लिम महिलेने कृष्णभक्तीत असं काही केलं की व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 30 मार्च : कृष्णवेडी म्हटलं की सर्वात आधी समोर येते ती राधा. कृष्णाचे देशातच नव्हे तर जगभरात कित्येक भक्त आहेत. पाश्चिमात्य देशांमधील महिलाही कृष्ण भक्तीत तल्लीन झालेल्या दिसतात. आता एका मुस्लिम महिलेचा कृष्णप्रेमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुस्लिम महिलेने कृष्ण भक्तीत जे केलं ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

सध्या रमजान सुरू आहे. अशात या मुस्लिम महिलेने कृष्ण भक्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ही महिला एका सोफ्यावर बसली आहे. तिच्या हातात एक पुस्तक दिसत आहे. त्यानंतर त्या पुस्तकात वाचत ती काहीतरी गाताना दिसते आहे. पुस्तकातील भाषा ऊर्दू दिसते आहे पण महिला जेव्हा त्या पुस्तकातील गाते तेव्हा त्या बोलात कन्हैय्याचा उल्लेख ऐकायला मिळतो.  कन्हैय्या., याद हे कुछ भी हमारी, असे या महिलेच्या तोंडातून निघणारे बोल आहेत. ही कृष्णावर आधारित कव्वाली आहे.

VIDEO - बॅगऐवजी कुकर-सूटकेसमधून पुस्तकं घेऊन जात आहेत कॉलेज विद्यार्थी; नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओतील महिलेचं नाव वजीहा अतहर नकवी आहे. तिने स्वतः  आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपला हा व्हि़डीओ पोस्ट केला आहे. वजीहाने पोस्टमध्ये म्हटलं की, रमजानच्या पूर्वसंध्येला नवाब सादिक जंग बहादूर हिल्मचं प्रसिद्ध कलाम कन्हैया गाऊन खूप आनंद झाला.

कन्हैय्या कृष्णासाठी असलेले एक गीत. पवित्र पैगंबरसाठी रूपकही आहे. दक्षिण आशियाच्या इंडो पारसी साहित्यिक परंपरेत हे सामान्य होतं, अशी माहितीही वजीहाने ट्वीटर पोस्टमध्ये दिली आहे की

काही दिवसांपूर्वी वजीहाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 23 मार्चचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. या महिलेचं खूप कौतुक होतं आहे.

First published:
top videos

    Tags: Ramdan 2023, Song, Viral, Viral videos