व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा अप्रतिम पद्धतीने स्केटबोर्ड खेळताना दिसत आहे. त्याच्या शेजारी उभा असलेली व्यक्ती कदाचित त्याचे वडील असावेत, जे त्याला स्केटिंगमध्ये मदत करत आहेत. परंतु मुलाचं स्वतःचं कौशल्य इतकं आश्चर्यकारक आहे की त्याला वडिलांच्या मदतीची फारशी गरज भासत नाही. या मुलाने सुरक्षिततेसाठी सर्व उपकरणे परिधान केली आहेत. त्याने डोक्यावर हेल्मेटही घातलं आहे आणि तो शिडीवरून हळूहळू खाली उतरताना दिसत आहे. तो स्केट बोर्ड हळूहळू पायऱ्यांवरून खाली घेतो आणि एकामागून एक सर्व पायऱ्या पार करून जमिनीवर पोहोचते. OMG! तरुणाच्या खांद्यावर चढले 2 विशालकाय अजगर अन्.., VIDEO पाहून उडेल थरकाप हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. याला 16 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 1 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे तर 20 हजारांहून अधिकांनी व्हिडिओ रिट्विट केला आहे. व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी स्केटबोर्डिंगचे इतर मजेदार व्हिडिओ शेअर केले आहेत. याशिवाय लोक या मुलाचं भरपूर कौतुक करत आहेत. एकाने म्हटलं की, हा मुलगा भविष्यात मोठा खेळाडू बनेल. अनेकांना व्हिडिओचा शेवटचा भाग आवडला आहे, ज्यामध्ये लहान मुलगा स्केट बोर्डवरून उडी मारताना दिसत आहे. याशिवाय लोक मुलाच्या वडिलांचंही खूप कौतुक करत आहेत. नेटकरी म्हणाले की वडील नेहमी असेच असतात. ते मुलांना निर्भय बनवतात परंतु गरज पडल्यावर त्यांना सावरण्यासाठी मागे नेहमी उभा असतात.He did it all the way.. 💪 pic.twitter.com/f8FpPorK5h
— Buitengebieden (@buitengebieden_) April 15, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.