Home /News /viral /

लग्नाच्या दिवशी लेहंगा आणि दागिने घालून नवरीबाईने मारले पुश-अप्स, VIDEO एकदा बघाच

लग्नाच्या दिवशी लेहंगा आणि दागिने घालून नवरीबाईने मारले पुश-अप्स, VIDEO एकदा बघाच

नवरीची ही स्टाईल पाहून सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. या व्हिडिओमध्ये लेहेंगा आणि दागिने घातलेली नवरीबाई चक्क पुश-अप्स (Bride Pushups Video) करताना दिसत आहे.

    नवी दिल्ली 15 एप्रिल : नवरी आणि नवरदेवाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात आणि या व्हिडिओंला नेटकऱ्यांची भरपूर पसंतीही मिळते . आजकाल एका नववधूचा असाच एक व्हिडिओ (Bride Video) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये नववधूने तिच्या अनोख्या स्टाइलने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नवरीची ही स्टाईल पाहून सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. या व्हिडिओमध्ये लेहेंगा आणि दागिने घातलेली नवरीबाई चक्क पुश-अप्स (Bride Pushups Video) करताना दिसत आहे. ‘ऊ अंटावा..’ गाण्यावर वधूपित्याचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकायला लागाल नवरीचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरीने भरपूर वजनदार लेहेंगा घातला आहे. याशिवाय तिने भरपूर दागिने घातलेले दिसतात. व्हिडिओमध्ये दिसतं की, नववधू अचानक दोन्ही हात जमिनीवर टेकवून पुश-अप मारण्यास सुरुवात करते. पुश-अप्स मारल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तो तुम्ही पाहू शकता. इतकेच नाही तर नवरी पुश-अप्स मारल्यानंतर तिचे मसल्सही दाखवते. नवरीबाईची ही अनोखी स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या भलतीच पसंतीस उतरत आहे. अवघ्या 12 सेकंदांचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. व्हिडिओ पाहून लोक नवरीची स्तुती करत आहेत. त्याचबरोबर काही लोक नवरी बॉडी बिल्डर असल्याचं म्हणत आहेत. Wedding Video: लग्न पद्धतीला 360 डिग्री फिरवलं; आलेले पाहुणेही हैराण हा व्हिडिओ @dineshakula नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करत याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं की, 'फिटनेसची वेगळी लेवल. लेहेंगा आणि दागिन्यांमध्ये पुश-अप करताना नवरीबाई. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं की, 'सासऱ्यांसाठी हा एक प्रकारचा इशारा आहे.' हा व्हिडिओ एका सलूनमध्ये शूट केल्याचं दिसत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bride, Wedding video

    पुढील बातम्या