नवी दिल्ली 15 एप्रिल : सापाचा नाव ऐकलं तरी आपल्यापैकी अनेकांच्या अंगावर काटा येतो. रस्त्यावरुन जाताना साप समोर दिसला तरी माणूस रस्ता बदलतो. मात्र, काही लोकांना सापाची अजिबातही भीती वाटत नाही आणि ते आपल्या हातांनी अगदी आरामात साप पकडतात. अशात अजगराबद्दल तर लोकांच्या मनात प्रचंड भीती असते. कारण हा साप अतिशय मोठा आणि लांब असतो. हा साप जितका लांब असतो, तितकंच त्याचं वजनही जास्त असतं. अशात एक नाही तर दोन दोन अजगरांना आपल्या खांद्यावर घेणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. Viral Video : रागात रिमोट फेकला अन् ‘गेम’ झाला, काही सेकंदात झालं एक लाखाचं नुकसान हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच हैराण व्हाल. व्हिडिओमधील सगळ्यात खास बाब म्हणजे इतक्या वजनदार सापांना खांद्यावर घेऊन हा तरुण आरामात डान्स स्टेपप्रमाणे काहीतरी करून दाखवतो (Man Dancing with 2 Pythons). हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याला लोकांची पसंतीही मिळत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका छोट्याशा रिकाम्या जागेत एक व्यक्ती उभा आहे. तो आपल्या दोन्ही खांद्यावर दोन अजगर उचलून घेतो. जेव्हा अजगर पूर्णपणे त्याच्या खांद्यावर असतात तेव्हा हा तरुण काहीतरी स्टेप करून दाखवतो. समोरून कोणीतरी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. हा व्हिडिओ हैराण करणारा असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. पाणी पित असताना बाटलीचं झाकणच घशात अडकलं; 9 वर्षीय विद्यार्थ्यासोबत पुढे काय घडलं पाहा, VIDEO इंस्टाग्रामवरील worldsofsnake नावाच्या पेजवरुन हा जबरदस्त व्हिडिओ शेअर केला गेला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सुमारे तीस हजार लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर अनेक लोक व्हिडिओ शेअरही करत आहेत.

)







