मराठी बातम्या /बातम्या /Viral /पोहण्याचा आनंद घेत होती मुलगी; अचानक जवळ शार्क आला अन्...; धडकी भरवणारा VIDEO

पोहण्याचा आनंद घेत होती मुलगी; अचानक जवळ शार्क आला अन्...; धडकी भरवणारा VIDEO

या घटनेत एक 11 वर्षाची मुलगी बीचवर पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात एक लहान शार्क (Shark Attack) तिच्यावर हल्ला करण्यासाठी आला.

या घटनेत एक 11 वर्षाची मुलगी बीचवर पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात एक लहान शार्क (Shark Attack) तिच्यावर हल्ला करण्यासाठी आला.

या घटनेत एक 11 वर्षाची मुलगी बीचवर पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात एक लहान शार्क (Shark Attack) तिच्यावर हल्ला करण्यासाठी आला.

नवी दिल्ली 26 ऑगस्ट : सध्या एक भयंकर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) होत आहे. या घटनेत एक 11 वर्षाची मुलगी बीचवर पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात एक लहान शार्क (Shark Attack) तिच्यावर हल्ला करण्यासाठी आला. यादरम्यान या मुलीचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला. या मुलीला जाणवलं की आपल्याजवळ काहीतरी आलं आहे आणि ती लगेचच उभा राहून पळू लागली. ही घटना साउथ कॅरोलिनाच्या नॉर्थ मर्चल बीचवरील आहे.

VIDEO - चिमुकला 'सुपरहिरो' जोमात, आईवडील कोमात! काय केला प्रताप तुम्हीच पाहा

यूपीआय न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, निकोल ऑइस्टर (Nicole Oister) आपली मुलगी सारा हिच्यासोबत रविवारी विकेंडवर गेले होते. मुलगी आपला बूगी बोर्ड घेऊन समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन खेळत होती. इतक्यात मुलीला तिथे एक लहान शार्कसारखं काहीतरी दिसलं आणि ही मुलगी पळू लागली. यादरम्यान मुलीची आई पाण्यात खेळणाऱ्या आपल्या मुलीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती.

कपलनं Honeymoon साठी केलेला खर्च ऐकून चक्रावून जाल; 2 वर्ष होते रोड ट्रिपवर

द सन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ओस्टरनं म्हटलं, की जेव्हा मी माझ्या मुलीवर हल्ला होताना पाहिलं तेव्हा मला वाटलं की कदाचित जेलिफिशनं तिला चावलं असावं. सारानं तिच्या जवळ काहीतरी येत असल्याचं पाहताच तिथून पळ काढला. कुटुंबीयांनी नंतर हा व्हिडिओ पाहिला असता समजलं की हा तर लहान शार्क होता. ओस्टरनं सांगितलं, की माझी मुलगी या घटनेनंतर प्रचंड घाबरली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही तिला केवळ हे समजावत राहिलो की असं होत नाही. आता ती पाण्यात उतरतानाही आमच्या आसपासच राहते आणि अत्यंत जागरूक राहते. कुटुंबीयांनी हा व्हिडिओ WMBF News सोबत शेअर केला.

First published:
top videos

    Tags: Shark death, Shocking video viral