नवी दिल्ली 26 ऑगस्ट : बहुतेक लोक लग्नानंतर काही दिवसांसाठी हनिमूनला
(Honeymoon) फिरण्यासाठी जातात. मात्र, एका कपलनं तब्बल दोन वर्ष हनिमूनला दिले आणि यासाठी लाखो रुपये खर्च केले. इतकंच नाही तर त्यांच्या या हनिमूनसाठी त्यांच्यासोबत एक लहान मुलगा आणि एक पाळवी कुत्राही गेला होता. हनिमूनचा हा आगळावेगळा किस्सा ब्रिटेनच्या
(Britain) एका कपलचा आहे.
2019 साली रॉस आणि सारा यांनी जगभरात फिरण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचं हनिमून साधं नव्हतं तर यासाठी आधी त्यांनी आपली नोकरी सोडली आणि यानंतर आपलं घरही भाड्यानं दिलं. यानंतर या कपलनं आपल्या खास ट्रिपसाठी आपल्या मुलाला आणि कुत्र्यालाही सोबत घेतलं. या फॅमिलीमून दरम्यान ते फ्रान्स, स्विझरलॅन्ड, इटली, स्पेन, तुर्की आणि बुल्गेरिया याठिकाणी फिरले.
VIDEO - मुंगूसापेक्षाही भारी पडला कोंबडा! प्रतिकार दूर सापाने भीतीनेच ठोकली धूम
मेट्रोनं दिलेल्या वृत्तानुसार, आता हे कपल पुन्हा घरी आलं आहे. त्यांचा मुलगा या ट्रिपच्या दरम्यान तीन वर्षांचा होता तो आता पाच वर्षांचा झाला आहे. रॉसनी या अनुभवाबाबत बोलताना सांगितलं, की प्रत्येक दिवस नवीन काहीतरी घेऊन येत असे. कपलनं ही संपूर्ण ट्रीप आपल्या व्हॅनमध्ये बसूनच पूर्ण केली आणि यासाठी त्यांनी तब्बल 13 लाख रूपये खर्च
(Couple Spent 13 Lakh on Honeymoon) केले. रॉसनं सांगतिलं, की त्यांना एकमेकांसोबत खास वेळ घालवायचा होता आणि हा निर्णय तितका सोपा नव्हता.
VIDEO - माकडानेही घेतला तिसऱ्या कोरोना लाटेचा धसका; संपूर्ण चेहराच मास्कने झाकला
रॉसनं सांगितलं, की नियमित नोकरी आणि सॅलरीसोबत हे करणं खूप कठीण होतं. याच कारणामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. रॉसनं म्हटलं की त्या दोन वर्षातील प्रत्येक क्षण आम्ही खूप आनंदात घालवला आणि कदाचित हा माझ्या आयुष्यातील एक सर्वात चांगला निर्णय होता. सारानं सांगितलं, की या ट्रिपआधी अनेकांनी आम्हाला भरपूर प्रश्न विचारले, कारण आम्ही जॉब सोडण्यामुळेही त्यांना काळजी वाटत होती. जून 2021 हे कुटुंब परत घरी आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.