नवी दिल्ली 11 ऑक्टोबर : लहान मुलांना सांभाळणं किती अवघड आहे, हे फक्त आई-वडिलच सांगू शकतात. लहान मुलांची भरपूर कृत्य अशी असतात जे पाहून आई-वडिलांना राग येत नाही, तर त्यांचं कौतुक वाटतं. मात्र, नुकतंच एका महिलेनं आपल्या लहान मुलीबाबत (Toddler) अशी एक गोष्ट शेअर केली, जी वाचून तुम्हाला हसू येईल. यात एका लहान मुलीनं चुकून आपली आई अंघोळ करत असतानाच तिचा लाईव्ह व्हिडिओ (Live Video) सुरू केला.
51 वर्षांनी पोलिसांना सापडलं वृद्धाचं हरवलेलं वॉलेट; उघडताच बसला धक्का
डेली स्टारच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या ब्रिआनाने नुकताच आपल्या मुलीचा एक मजेशीर किस्सा सोशल मीडिया साईट टिकटॉकवर (Social Media Site Tiktok) शेअर केला आहे. तिनं सांगितलं, की एक दिवस ती आपल्या मुलीला गेम खेळण्यासाठी फोन देऊन अंघोळीसाठी गेली. तिनं मोबाईलवर एक प्री-स्कूलची लर्निंग गेम लावली होती. तिची मुलगी अतिशय लहान असल्यानं तिला मोबाईल चालवणं येत नसे. त्यामुळे, ती मोबाईलवर काहीही बटण दाबत होती.
ब्रिआना बाथरूममध्ये अंघोळ करत असताना तिच्या मुलीने दरवाजा वाजवला आणि म्हटलं की फोनमध्ये काहीतरी झालं आहे. तिची गेम चालत नाहीये. महिलेनं मुलीला बाथरूममध्ये बोलावलं आणि तिच्या हातातून फोन घेऊन पाहू लागली. महिला फोनची सेटिंग तपासत असतानाच तिचं लक्ष नोटिफिकेशन विंडोकडे गेलं. हे पाहून ती हैराण झाली.
हिला लग्नातही थोडीशी हवीच! दारूड्या नवरीबाईने कशी सेटिंग लावली पाहा VIDEO
महिलेनं नोटिफिकेशन विंडोमध्ये पाहिलं, की बॅकग्राउंडमध्ये इन्स्टाग्राम लाईव्ह (Instagram Live) ऑन आहे आणि कॅमेऱ्यात व्हिडिओ शूट होत आहे. हे पाहताच तिला धक्का बसला आणि लगेचच तिनं व्हिडिओ बंद केला. ब्रिआनाच्या टिकटॉकवर अनेकांनी कमेंट करत या व्हिडिओवर टीका केली आहे. काही आई-वडिलांनी आपल्यासोबत घडलेल्या अशांचा काही घटनांचा अनुभव शेअर केला आहे. एका व्यक्तीनं ब्रिआनाला म्हटलं, की मुलांकडे फोन देताना त्यात चाईल्ड सेटिंह अॅक्टिव्हेट करायला हवी. यामुळे मुलं इतर कोणीतेही अॅप उघडू शकत नाहीत. एका महिलेनं म्हटलं, की तिच्या मुलानंही एकदा असंच केलं होतं. ती बाथटबमध्ये असताना त्यानं फेसबुक लाईव्ह सुरू केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news