नवी दिल्ली 11 डिसेंबर : सापाचं लहान पिल्लू पाहिलं तरी अनेकांना घाम फुटतो. अशात एखाद्याच्या समोर अजगर आला तर नक्कीच कोणाचाही थरकाप उडेल. मात्र, सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ (Video Viral on Social Media) समोर आला आहे, तो पाहून तुम्हालाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी भल्यामोठ्या अजगरासोबत खेळताना दिसते (Small Girl Playing with Python). माकडाने शेवटपर्यंत सोडली नाही मित्राची साथ अन् झाला चमत्कार; पाहा VIDEO लहान मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक 6-7 वर्षाची लहान मुलगी 20 फूटाहून लांब भल्यामोठ्या अजगरासोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. सहसा लहान मुलं प्राणी आणि भीतीदायक गोष्टींना जास्त घाबरतात असं म्हटलं जातं. मात्र हा व्हिडिओ ही बाब पूर्णपणे चुकीची ठरवणारा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की 6-7 वर्षाची चिमुकली खाली बसलेली आहे. इतक्यात समोरून 20-22 फूट लांब अजगर येतो. एवढा मोठा अजगर समोर आल्यावर कोणाचाही थरकाप उडेल. मात्र ही चिमुकली अजिबातही घाबरत नाही. यानंतर जे काही होतं ते पाहून सगळेच हैराण झाले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही चिमुकली अजगराला अजिबातही घाबरत नाही.
तुम्ही पाहू शकता की ही चिमुकलीच अजगराचा रस्ता अडवते आणि त्याच्या समोर उभा राहते. या चिमुकलीच्या जिद्दीपुढे अजगरही माघार घेताना दिसतो. तो या चिमुकलीला काहीही न करता आपला रस्ता बदलतो आणि दुसरीकडून जाऊ लागतो. चिमुकलीचा हा अंदाज लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. ‘प्रेयसीचं निधन झालंय आणि..’; तरुणाची विचित्र उत्तरं ऐकून खळखळून हसाल, VIDEO व्हिडिओमध्ये ही चिमुकली ज्या पद्धतीने अजगरासोबत खेळत आहे, ते पाहून असं वाटतं की दोघंही फार चांगले मित्र आहेत. ही चिमुकली अजगराला हात लावतानाही दिसते. यादरम्यान अजगर चिमुकलीला काहीही करत नाही. व्हिडिओ पाहून लोक चिमुकलीच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंट snake._.world वरुन शेअर केला गेला आहे.