Home /News /viral /

ही दोस्ती तुटायची नाय! माकडाने शेवटपर्यंत सोडली नाही मित्राची साथ अन् झाला चमत्कार; पाहा VIDEO

ही दोस्ती तुटायची नाय! माकडाने शेवटपर्यंत सोडली नाही मित्राची साथ अन् झाला चमत्कार; पाहा VIDEO

एका माकडाने दुसऱ्या माकडाची मदत करून त्याचा जीव वाचवला आहे.

    मुंबई, 11 डिसेंबर : सध्याच्या युगात माणसातली माणुसकी हरवत चालली आहे. माणसं माणसांसाठीही धावून जात नाहीत. संकट ओढावतच आपल्या अगदी जवळील माणसंही आपल्यापासून दूर जाताना दिसतात. पण अशात प्राण्यांनी (Animal video) मात्र माणुसकी कायम ठेवली आहे (Humanity in animal video). असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात एका माकडाने (Monkey video) दुसऱ्या माकडाचा जीव वाचवला आहे (Monkey saved other monkey life). माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलात चर्चेत आहे. मरणाच्या दारात पोहोचलेल्या एका माकडासाठी दुसरं माकड धावून आलं. शेवटपर्यंत त्या माकडाने त्याची साथ सोडली नाही. त्याच्यात पुन्हा जीव आणण्यासाठी तो धडपडत होता आणि अखेर त्याची साथ, त्याचं प्रेम आणि त्याची धडपड फळाला आली. मरणावस्थेत असलेल्या त्या माकडात जीव आलाच. व्हिडीओत पाहू शकता रेल्वेच्या पटरींवर एक माकड पडलं आहे. माकडाची अवस्था पाहून त्याला विजेचा धक्का लागला असावा असंच दिसतं आहे. ज्यामुळे त्याचं शरीरच काम करत नाही आहे. त्याच्या शरीराची हालचालच होत नाही आहे. हे वाचा - OMG! स्वतःच्या हातांनी चक्क मगरीलाच भरवायला गेला आणि...; VIDEO पाहूनच धडकी भरेल आपल्या साथीदाराला अशा अवस्थेत पाहून दुसरं माकड त्याच्यासाठी धावून आलं. याजागी जर माणूस असता तर कदाचित हे माकड मृत झालं असं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं असतं. पण या माकडाने मात्र तसं बिलकुल केलं नाही. माकडाची हालचाल होत नव्हती तरी त्याने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. एखाद्या डॉक्टरप्रमाणे त्याच्या छातीवर दाब दिला. नंतर त्याला तिथंच असलेल्या गटाराच्या पाण्यातही टाकलं. अखेर ते माकड हालचाल करू लागलं. फक्त हालचालच नाही तर ते उठून बसलं. ते माकड पुन्हा जिवंत होताच त्याला वाचवणारं माकड तिथून गेलं. हे वाचा - VIDEO - तहानलेल्या कुत्र्यासाठी धावून आला चिमुकला; जे केलं ते पाहून वाटेल हेवा @RebeccaH2030 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स माकडाचं कौतुक करत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Other animal, Viral, Viral videos

    पुढील बातम्या