नवी दिल्ली 11 डिसेंबर : सोशल मीडियावर देश-विदेशातील अनेक मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या इन्स्टाग्रामवर पाकिस्तानातील एका महिला रिपोर्टरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानची महिला रिपोर्टर (Pakistani Female Reporter Video) एका पार्कमध्ये कुठल्यातरी मुद्द्यावर लोकांच्या प्रतिक्रिया घेताना दिसते. यादरम्यान ती एका तरुणाजवळ पोहोचते. मात्र हा तरुण महिला रिपोर्टरला ज्या पद्धतीने उत्तर देतो, ते ऐकून तुम्हीही खळखळून हसाल (Funny Video Viral).
मोबाईल रिचार्ज करून दिला तरीही सोडून गेली अन्...; तरुणाने मांडली व्यथा, VIDEO
इन्स्टाग्रामवर पोस्ट कऱण्यात आलेला हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे, की तुम्हीही वारंवार पाहाल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिला रिपोर्टर लोकांच्या प्रतिक्रिया घेता घेता या तरुणाजवळपृ पोहोचते. यानंतर ती या तरुणाला काही सवाल करते. महिला रिपोर्टर या तरुणाला विचारते की तुझी कोणी प्रेयसी आहे का? यावर हा युवक अतिशय मजेशीर उत्तर देतो. तो सांगतो की माझ्या गर्लफ्रेंडचं (Girlfriend) दोन आठवड्यांआधीच निधन झालं. हा युवक सांगतो की तिला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला.
View this post on Instagram
यानंतर रिपोर्टरलाही समजतं की हा तरुण खोटं बोलत आहे. रिपोर्टर यानंतर तरुणाला विचारते की तुझ्या प्रेयसीचं नाव काय होतं? हे ऐकून तरुण आभाळाकडे पाहू लागतो. मात्र त्याला अचानक काहीही सुचत नाही आणि तो सांगतो की मी तिचं नाव विसरलो. यानंतर रिपोर्टरचे हावभाव पाहण्यासारखे होतात. मात्र तरीही ती युवकाला विचारते की तुझं असलं कसलं प्रेम आहे की तू नावही विसरला.
तरुणांना डेट करण्यासाठी आईने चोरलं मुलीचं आयडी कार्ड; पुढे जे घडलं ते धक्कादायक
यानंतर महिला रिपोर्टर विचारते की इतका दुःखात आहेस तर पार्कमध्ये का फिरतोय. यानंतर हा तरुण जे उत्तर देतो, ते ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल. हा तरुण म्हणतो की पार्कमध्ये मी यासाठी फिरत आहे जेणेकरून इथे त्याला दुसरी एखादी मैत्रिण मिळेल. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ bhutni_ke_memes नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Girlfriend