मराठी बातम्या /बातम्या /Viral /इवल्याशा हातांनी भरभर चिरतो भाजी; चिमुकल्या शेफचा VIDEO पाहून तुम्हीही हैराण व्हाल

इवल्याशा हातांनी भरभर चिरतो भाजी; चिमुकल्या शेफचा VIDEO पाहून तुम्हीही हैराण व्हाल

जे तुम्हालाही जमलं नसेल ते या चिमुकल्याने करून दाखवलं आहे.

जे तुम्हालाही जमलं नसेल ते या चिमुकल्याने करून दाखवलं आहे.

जे तुम्हालाही जमलं नसेल ते या चिमुकल्याने करून दाखवलं आहे.

मुंबई, 03 जून : तुम्हाला स्वयंपाक (Cooking) करायला आवडत असेल तर तुम्ही कुकिंग शो नक्कीच पाहत असाल. त्यात तो शेफ ज्या वेगाने भरभर भाज्या चिरतो (Cutting vegetable) तसा प्रयत्न कदाचित तुम्हीही कधीतरी केला असेल. पण तितक्या वेगाने मात्र तुम्हाला कधीच शक्य झालं नसेल आणि तसं जमत जरी असेल तरी त्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली असेल म्हणजे खूप प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला ते कौशल्य आत्मसात झालं असेल. त्यामुळे एखाद्या चिमुकल्याने अगदी शेफसारख्याच (Baby chef) वेगात भाजी चिरली (Baby cutting vegetable), असं सांगितलं तर साहजिकच तुम्हाला आश्चर्य वाटेल.

ज्या मुलाला स्पष्ट बोलताही येत नाही, नीट तोल सावरत चालताही येत नाही, असा मुलगा आपल्या इवल्या इवल्या हातांनी भरभर भाजी कापतो. हे ऐकून किंवा वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही. मग तुम्ही प्रत्यक्षच हा व्हिडीओ (Baby video) पाहा. आपल्या इवल्याशा हातांनी भरभर भाजी चिरणाऱ्या या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल.

वर्ल्ड ऑफ बेबीज इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहू शकता एखाद्या शेफच्या हातात जसा मोठा चाकू असतो, अगदी तसाच चाकू या चिमुकल्याच्या हातातही आहे आणि तो त्या चाकूने कोथिंबीर कापताना दिसतो आहे. एका हाताने त्याने कोथिंबीर धरली आणि दुसऱ्या हाताने चाकूने ती भऱभर कापतो आहे.

हे वाचा - हुश्शार कावळा! मांजराची फजिती करून तिच्या तोंडचा घासही पळवला; पाहा VIDEO

तशी कोथिंबीर चिरली जात नाही. कारण साहजिकच हा चाकू नकली आहे. पण ते महत्त्वाचं नाही तर त्या मुलाचा भाजी चिरण्याचा वेग आणि त्याचा आत्मविश्वास, अॅट्यिट्युट खूप महत्त्वाचा आहे. आपण एखादे शेफच आहोत, भाजी चिरणं जणू आपल्या हातातील काम आहे, अशाच जोमाने हा चिमुरडा भाजी कापताना दिसतो आहे. चाकू आपल्या हातावर बसेल याची भीती तर त्याच्या चेहऱ्यावर नाहीच. पण तो हाताला लागणारही नाही इतक्या सफाईने तो ती कोथिंबीर चिरतो आहे.

हे वाचा - काठीऐवजी तरुणीने हातानेच पकडला भलामोठा साप; पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

हातात एखादा मोठा चाकू आणि आपल्या डोळ्याची पापणी लवते न लवते तो भरभर भाजी चिरणं, कुकिंग शो, कुकिंग स्पर्धेत तुम्ही पाहिलंच असेल. भाजी चिरणं हीसुद्धा एक कलाच असते. मोठमोठ्या प्रसिद्ध शेफकडे किंवा हॉटेलमधील शेफमध्येही हे कौशल्य तुम्ही पाहिलं असेल किंवा तुमच्या घरातही अन्नपूर्णा असलेली आई, आजी किंवा ताईसुद्धा विशेष प्रशिक्षण न घेताही सवयीने हे कौशल्य आत्मसात करते. त्यांना अशी भाजी चिरताना पाहून त्यांना हे कसं बरं जमतं, असाच प्रश्न आपल्याला पडतो. त्यावेळी या चिमुकल्याला हे कौशल्य आत्मसात केलेलं पाहून त्याचं कौतुकच वाटतं.

हे वाचा - VIDEO: सुपरमॅनच्या पोशाखात थाटात बस थांबवायला गेला आणि...

या चिमुकल्या शेफला खूप पसंती मिळते आहे. सोशल मीडियावर त्याचं खूप कौतुक होतं आहे. काय मग तुम्हाला आवडला हा चिमुकला शेफ मग आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

First published:

Tags: Chef, Funny video, Small baby, Vegetable, Viral, Viral videos