मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - काठीऐवजी तरुणीने हातानेच पकडला भलामोठा साप; पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

VIDEO - काठीऐवजी तरुणीने हातानेच पकडला भलामोठा साप; पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

महिला जेव्हा या सापाला आपल्या हातात पकडते, तेव्हा जे घडतं ते पाहून काळजाचा ठोकाच चुकतो.

महिला जेव्हा या सापाला आपल्या हातात पकडते, तेव्हा जे घडतं ते पाहून काळजाचा ठोकाच चुकतो.

महिला जेव्हा या सापाला आपल्या हातात पकडते, तेव्हा जे घडतं ते पाहून काळजाचा ठोकाच चुकतो.

मुंबई, 03 जून: सापाला (Snake) पकडणं तसं सोपं काम नाही. त्यातही तो भलामोठा साप असेल तर त्याला आवरणंही अशक्य. सर्पमित्र जेव्हा एखाद्या सापाला पकडतात तेव्हा त्यांच्या हातातील साप पाहून आपल्यालाच घाम फुटतो. आता हा दंश करतो की काय अशीच भीती वाटते. सध्या असाच एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात एका महिलेनं असाच एक विशाल साप पकडला आहे. हा व्हिडीओ (Snake video) पाहून अंगाचा थरकाप उडेल.

सामान्यपणे साप पकडताना सर्पमित्रांच्या हातात एका काठी, एक पिशवी असते. शक्यतो ते काठीच्या मदतीने सापाला आवरण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते त्याला पिशवीत भरतात. त्यावेळी आपल्या सुरक्षेचीही ते पुरेपूर काळजी घेतात. चुकून सापाने दंश केलाच तर त्यांच्या हातात ग्लोव्ह्जही असतात. पण या महिलेनं मात्र फक्त हातानेच सापाला पकडलं आहे.

" isDesktop="true" id="559733" >

व्हायरल हॉगने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता, तसा हा रहदारीचा रस्ता आहे. रस्त्याशेजारीच एक महिला साप पकडताना दिसते आहे. तिच्या हातात इतका मोठा साप आहे की जर तो सरळ केला तर तिच्या उंचीपेक्षाही मोठा आहे. फक्त लांबीच नाही तर आकाराने तो भारीच आहे.

हे वाचा - विषारी कोब्राला तरुणाने तोंडाने श्वास दिला आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

महिला जेव्हा त्याला आपल्या हातात पकडते, तेव्हा तो तिच्या हातातून सुटण्यासाठी धडपड करत असतो. महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी सापाला असं पाहून आपल्या काळजाचाही ठोका चुकतो. सुदैवाने महिला सापावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होते. सापाच्या तोंडाजवळ ती पकडते. त्यानंतर साप शांत होते. पुढे गेल्यानंतर ही महिला त्या सापाला आपल्या कमरेभोवती गुंडाळते.

हे वाचा - Shocking! अंतिम दर्शन सुरू असताना अचानक उठून बसला मृतदेह; VIDEO पाहून फुटेल घाम

हा व्हिडीओ व्हिएतनामचा असल्याचं सांगितलं जातं आहे. व्हिडओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. नेटिझन्सना तर हा व्हिडीओ पाहून तसा धक्काच बसला आहे. महिलेच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे. बहुतेकांनी तर आपल्यात असं काही करण्याचं धाडस नाहीच, असंच म्हटलं आहे.

First published:

Tags: Shocking viral video, Snake, Snake video, Viral, Viral videos