मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हुश्शार कावळा! मांजराची फजिती करून तिच्या तोंडचा घासही पळवला; पाहा VIDEO

हुश्शार कावळा! मांजराची फजिती करून तिच्या तोंडचा घासही पळवला; पाहा VIDEO

आपल्याला हवी असलेली वस्तू अगदी हुशारीने कशी मिळवायची हे या हुश्शार कावळ्यांकडूनच शिकायला हवं.

आपल्याला हवी असलेली वस्तू अगदी हुशारीने कशी मिळवायची हे या हुश्शार कावळ्यांकडूनच शिकायला हवं.

आपल्याला हवी असलेली वस्तू अगदी हुशारीने कशी मिळवायची हे या हुश्शार कावळ्यांकडूनच शिकायला हवं.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 03 जून : सामान्यपणे आपल्याला कुणाकडून एखादी वस्तू असेल तर ती आपण मागून घेतो. त्या व्यक्तीने आपल्याला ती वस्तू नाही दिली आणि आपल्याला ती हवी असेलच तर त्यासाठी आपण भांडतो. इतकंच नव्हे तर ती वस्तू आपण हिसकावूनही घेतो. पण आपल्याला हवी असलेली वस्तू अगदी हुशारीने कशी मिळवायची हे या हुश्शार कावळ्यांकडूनच शिकायला हवं. ज्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दोन कावळ्यांनी मिळून एका मांजराची चांगलीच फजिती केली. अगदी तिच्या तोंडाशी असलेलं तिचं खाणं या कावळ्यांनी तिच्याशी झटापट न करता अगदी हुशारीने पळवून नेलं आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक स्वतःसाठी काहीतरी खायला घेऊन आली आहे. तेव्हा तिथे दोन कावळेही ते खाण्यासाठी हजर होतात. मांजराचं लक्ष आपल्या खाण्याकडेच आहे. आपल्या खाण्यात दुसरे वाटेकरी आले आहेत, याची तिला कल्पनाही नाही.

हे वाचा - एका छोट्याशा पक्ष्याला वाचवण्यासाठी शार्कजवळ गेला आणि...; समुद्रातील थरारक VIDEO

त्यावेळी एक कावळा मांजरीजवळ जातो आणि तिच्या पाठीवर आपल्या चोचीने मारतो आणि तिथून पटकन उडतो. कावळ्याने मारताच मांजर पिसाळते. ती रागाने कावळ्याच्या मागे धावत जाते. त्यावेळी आपलं खाणं मात्र तिथंच सोडून जाते. तोपर्यंत इथं दुसरा कावळा पटकन पुढे येत आपल्या चोचीत ते खाणं धरतो आणि भुर्रकन उडून जातो. मांजर जेव्हा एका कावळ्याला हुसकावून मागे येते, तेव्हा मात्र तिच्यासाठी काहीच राहत नाही.

हे वाचा - जिराफाची शिकार करणं सिंहाला पडलं भारी, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं

आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. टिमवर्क काय असतं, हेच त्यांनी या व्हिडीओतून दाखवून दिलं आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. कावळ्याच्या हुशारीला सर्वांनी दाद दिली आहे.

First published:

Tags: Cat, Funny video, Viral, Viral videos