मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: सुपरमॅनच्या पोशाखात करायला गेला बस थांबवण्याची नक्कल; अन् ‘बस’ली जोराची धडक

VIDEO: सुपरमॅनच्या पोशाखात करायला गेला बस थांबवण्याची नक्कल; अन् ‘बस’ली जोराची धडक

सुपरमॅनचा (Superman) ड्रेस घातलेल्या एका विनोदी कलाकारानं बसला केवळ हात लावून चालती बस थांबवल्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसनं त्याला धडक दिल्यानं त्याचा हा बेत उधळला गेला.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 3 जून : टीव्हीवरील कार्यक्रम पाहून अनेकजण त्यातील स्टंट करायला जातात, काहीजण तर असे स्टंट कुठे घरात, निर्जन स्थळी नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर देखील करण्यास मागं-पुढं पाहत नाहीत. याचा फटका त्यांना स्वत:लाही बसतोच आणि इतरांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो, असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. 

सुपरमॅनचा (Superman) ड्रेस घातलेल्या एका विनोदी कलाकारानं बसला केवळ हात लावून चालती बस थांबवल्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसनं त्याला धडक दिल्यानं त्याचा हा बेत उधळला गेला. सुदैवानं त्याला स्वतःला फारसे लागले नाही. पण या प्रकारामुळं लोकांना आधी धक्का देणारा आणि नंतर हसवणारा व्हिडिओ बनवण्यात या विनोदी कलाकाराला यश आलंय.

कॉमेडियन लुईझ रिबेरो डी ग्रांडे किंवा अँड्राडे रस्त्यावर उभे राहून चालती वाहनं थांबवणाऱ्या सुपरमॅनची नक्कल करत होता. याचं व्हिडिओ शूटिंगही तो करत होता. सुपरमॅनचा लाल-निळा पोशाख घातलेला 35 वर्षीय अँड्राडे आता आपल्या शरीरात पोलादाचं बळ आल्याचं चाहत्यांना सांगतो. पाठीमागून येणारी बस आता केवळ हात लावून थांबवणार असल्याची बतावणीही करतो. पण दुर्दैवानं तेवढ्यात ती बस त्याला पाठीमागून धडक देते आणि त्याचं हसं होतं.

ब्राझीलच्या बारा डॉस कोकिरोसमध्ये त्यानं हा व्हिडिओ शूट केला आहे. बसनं धडक दिल्यामुळं अँड्राडे थोडासा गडबडतो. पण लगेच पुन्हा सावरून घेत पुन्हा व्हिडिओ बनवणं सुरू करतो. बसच्या वेगाचा अंदाज न आल्यानं अँड्राडेला स्वतःचं 'सुपर-सामर्थ्य' आणि पोलादी शरीराची कमाल चाहत्यांना दाखवता आली नाही.

हे वाचा - राहुल गांधींनी 50 जणांना सोशल मीडियावरुन केलं ‘Unfollow’, काय आहे त्या मागचं कारण

मात्र, त्यानं डगमगून न जाता चित्रीकरण सुरूच ठेवल्यानं व्हिडिओच्या शेवटी या कलाकाराला बस धडकल्यानंतर फारसं काही झालेलं नाही, हे पाहून चाहत्यांचा जीव भांड्यात पडतो. अशा व्हिडिओमुळं लोकांच मनोरंजन होतं मात्र बसची धडक जर जोरात बसली असती तर मोठा अपघातही झाला असता. त्यामुळं असे हे स्टंट करताना काळजी घ्यायला हवी, कारण हे स्टंट जीवघेणे ठरू शकतात.

First published:

Tags: Live video viral, Video viral