जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सोफ्यावर गेम खेळत होता लहान मुलगा; इतक्यात जवळ आला महाकाय साप अन्.., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

सोफ्यावर गेम खेळत होता लहान मुलगा; इतक्यात जवळ आला महाकाय साप अन्.., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

सोफ्यावर गेम खेळत होता लहान मुलगा; इतक्यात जवळ आला महाकाय साप अन्.., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ लोकांना हैराण कऱणारा आहे. जवळपास 20 फूट लांब साप घरात फिरताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 10 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. काही व्हिडिओ तर असे असतात जे आपण वारंवार बारकाईने बघतो आणि मगच आपला त्यावर विश्वास बसतो. नुकतंच असाच आणखी एक व्हिडिओ (Shocking Video Viral) समोर आला आहे. यात एक महाकाय साप सोफ्यावर बसल्याचं दिसतं. सोफ्यावर फक्त सापच नाही तर एक लहान मुलगाही झोपलेला आहे. हा मुलगा न घाबरता अगदी आरामात फोनमध्ये गेम खेळत आहे. हा व्हिडिओ (Snake Viral Video) पाहून तुम्हीही नक्कीच हैराण व्हाल. तरुणानं मगरीच्या जबड्यात घातला हात; चवताळलेल्या मगरीनं केला हल्ला अन्.., VIDEO काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ लोकांना हैराण कऱणारा आहे. जवळपास 20 फूट लांब साप घरात फिरताना दिसत आहे. हा साप घरातील फरशीपासून सोफ्यापर्यंत पसरलेला असून आरामात फिरत आहे. त्याच्या शेजारीच सोफ्यावर एक लहान मुलगा झोपलेला आहे. न घाबरता हा मुलगा फोनमध्ये गेम खेळत आहे. या मुलाचे हावभाव पाहून असं वाटतं की त्याची सापासोबत चांगलीच ओळख आहे आणि सापासून त्याला काहीही धोका नाही.

जाहिरात

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साप सोफ्यावर या लहान मुलाच्या एकदम शेजारीच आहे. यानंतर फ्रेममध्ये जे काही दिसतं, ते हैराण करणारं आहे. या मुलाच्या डोक्याजवळच सापाचं तोंड दिसतं. मात्र, हा साप या काहीच नुकसान पोहोचवत नाही. व्हिडिओ पाहून कोणाचाही थरकाप उडेल. मित्रासोबत भयंकर मस्करी; सोफ्यावर बसताच बॉम्ब फुटला अन् हवेत उडाला तरूण, VIDEO सामान्य लोक सापासोबत इतक्या आरामात बसण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर royal_pythons नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात