मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तरुणानं मगरीच्या जबड्यात घातला संपूर्ण हात; चवताळलेल्या मगरीनं केला हल्ला अन्.., Shocking Video

तरुणानं मगरीच्या जबड्यात घातला संपूर्ण हात; चवताळलेल्या मगरीनं केला हल्ला अन्.., Shocking Video

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती मगरीसोबत स्टंट करत आहे. यादरम्यान तो मगरीच्या जबड्यात आपला संपूर्ण हातच घालतो

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती मगरीसोबत स्टंट करत आहे. यादरम्यान तो मगरीच्या जबड्यात आपला संपूर्ण हातच घालतो

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती मगरीसोबत स्टंट करत आहे. यादरम्यान तो मगरीच्या जबड्यात आपला संपूर्ण हातच घालतो

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 10 नोव्हेंबर : 'स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देणं' हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकली असेल. सध्या सोशल मीडियावर (Social Media) याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मगरीसोबत स्टंट (Stunt With Crocodile) करताना दिसतो. यादरम्यान असं काही घडतं की ते पाहून तिथे उपस्थित सर्वच घाबरले. अवघ्या 28 सेकंदाचा हा व्हिडिओ (Shocking Video Viral) हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या व्यक्तीचं कृत्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

VIDEO: पायाने साधला अचूक निशाणा; तरुणीची तिरंदाजी पाहून घालाल तोंडात बोटं

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती मगरीसोबत स्टंट करत आहे. यादरम्यान तो मगरीच्या जबड्यात आपला संपूर्ण हातच घालतो. ज्या जबड्यातून सिंहासारखा बलाढ्य प्राणीही वाचत नाही, अशा मगरीच्या जबड्यात हा व्यक्ती अगदी आरामात आपला संपूर्ण हात टाकतो. मगर हल्ला करण्यात अगदीच पटाईत आहे, सवयीप्रमाणे तिनं इथेही तसंच काहीसं केलं. काहीच सेकंदाच मगरीनं या व्यक्तीचा हात आपल्या जबड्यात पकडला. मात्र सुदैवाने मगरीच्या जबड्यातून आपला हात बाहेर काढण्यात हा व्यक्ती यशस्वी ठरला.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

हृदयाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. एक दिवसाआधी अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 56 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. बहुतेकांनी स्टंट करणाऱ्या या व्यक्तीला चुकीचं ठरवलं आहे.

22 मजली इमारतीच्या छतावर चढून चिमुकल्यांचा भयंकर स्टंट, थरकाप उडवणारा VIDEO

हा व्हिडिओ पाहून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, मला कोणत्याच अँगलने हे योग्य काम वाटत नाही. तर दुसऱ्या एकानं कमेंट करत लिहिलं, की मगरीसोबत स्टंट करणं हा वेडेपणा आहे. लोक असं काही कसं काय करू शकतात, हेच मला समजत नाही. काही लोकांनी या तरुणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Crocodile, Shocking video viral, Stunt video