Home /News /viral /

नवरदेवाच्या बहिणीने नवरीसोबत केली विचित्र मस्करी; क्षणात दुःखात बदललं आनंदाचं वातावरण

नवरदेवाच्या बहिणीने नवरीसोबत केली विचित्र मस्करी; क्षणात दुःखात बदललं आनंदाचं वातावरण

20 वर्षाच्या या मुलीनं नवरीच्या ज्या बहिणीची मस्करी केली, तिचं २ वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. यामुळे सगळेच भावुक होते.

  नवी दिल्ली 22 जानेवारी : लग्नाआधी आजकाल अनेकजण बॅचलर पार्टी (Bachelorette Party) आणि हेन्स पार्टी करताना दिसतात. हेन्स पार्टीमध्ये नवरीसोबतच बाकी मुली आणि बॅचलर पार्टीमध्ये मुलं आपल्या ग्रुपसोबत मस्ती करतात. एकंदरीतच लग्नाच्याआधीची ती संध्याकाळ अतिशय खास बनवण्याचा प्रयत्न केला जातो. यात मस्करी आणि मस्तीही भरपूर होते. मात्र, मस्करीने सीमा पार केली आणि यामुळे कोणाचं मन दुखावलं गेलं, तर याला वेगळंच रूप येतं. मात्र, अनेकांना याची समज नसते. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. '...असेच पुरुष मला आवडतात', सर्वात उंच Adult Star ने केला शॉकिंग खुलासा या घटनेत मुलाच्या बहिणीने नवरीच्या पार्टीमध्ये तिच्या बहिणीबद्दल अशी मस्करी केली, की ज्यामुळे संपूर्ण वातावरणच बिघडलं. 20 वर्षाच्या या मुलीनं नवरीच्या ज्या बहिणीची मस्करी केली, तिचं २ वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. यामुळे सगळेच भावुक होते. अशात तिच्या नावे मस्करी करणं, कोणालाच आवडलं नाही. सगळेच पार्टीमध्ये मस्ती करण्यात मग्न होते. ही पार्टी नवरीसाठी अधिक खास व्हावी, यासाठी तिच्या मैत्रिणी आणि कुटुंबीय पुरेपुर प्रयत्न करत होते. पार्टीमध्ये गाणी, डान्स, मस्करी, जोक्स असं सगळं काही होतं. इतक्यात नवरदेवाची बहिणही तिथे आली. तिने आपल्या भावाच्या होणाऱ्या पत्नीसाठी सरप्राईज गेस्ट प्लॅन (Surprise Guest Plan) केला होता. ती हे गिफ्ट घेऊन समोर येताच सगळेच हैराण झाले. तिच्या हातांमध्ये एक मानवी सांगाडा (Human Skeleton) होता, याला नवरीच्या बहिणीचा ड्रेस घातला गेला होता. हे पाहून सगळेच भडकले. हा सांगडा त्या बहिणीच्या नावाने आणला गेला होता, जिचं वयाच्या 16 व्या वर्षी निधन झालं होतं. हा विचित्र प्रँक तिला चांगलाच महागात पडला.

  मेलो, वाचवा.. वाचवा…! तरुणाच्या आरोळ्यांनी मित्राला आवरेना हसू, VIDEO पाहून

  नवरदेवाच्या बहिणीने केलेली ही मस्करी पाहून नवरीचे कुटुंबीय अतिशय नाराज झाले. परिस्थिती इतकी बिघडली की लग्न तुटण्यापर्यंत ही बाब पोहोचली. नवरी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये नवरदेवाच्या बहिणीचा चेहरा पाहण्यासाठी तयार नाही. इकडे नवरदेवही बहिणीच्या या कृत्यामुळे भडकला. बहिणीच्या चुकीच्या कृत्यामुळे आपलं लग्न तुटत असल्याने नवरदेवही तिच्यावर भडकला. यामुळे त्याने बहिणीला लग्नातच न बोलवण्याचा निर्णय घेतला. नवरदेवाची बहीण लग्नात येणार नाही, हे ठरल्यानंतरच नवरी लग्नासाठी तयार झाली.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Party, Wedding

  पुढील बातम्या