Home /News /viral /

'...असेच पुरुष मला आवडतात', सर्वात उंच Adult Star ने केला शॉकिंग खुलासा

'...असेच पुरुष मला आवडतात', सर्वात उंच Adult Star ने केला शॉकिंग खुलासा

'मला कमी उंची असलेले पुरुष अधिक आवडतात', असा खुलासा रॉकीनं एका मुलाखतीत केला आहे. 'डेटिंग लाइफ'मधल्या (Dating Life) काही गोष्टींवर बोलताना तिनं हा खुलासा केला आहे.

लॉस एंजलिस, 21 जानेवारी: अडल्ट इंडस्ट्रीतील स्टार्स देखील सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. या स्टार्सच्या खासगी आयुष्याविषयी नेटिझन्समध्ये उत्सुकता पाहायला मिळते. सोशल मीडियावर (Social Media) या स्टार्सचे फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या सर्वाधिक उंची असलेली अमेरिकन अडल्ट स्टार रॉकी इमर्सन (Rocky Emerson) अशीच चर्चेत आहे. ती चर्चेत येण्यामागचं कारणही जरा विचित्र आहे. 'मला कमी उंची असलेले पुरुष अधिक आवडतात', असा खुलासा रॉकीनं एका मुलाखतीत केला आहे. 'डेटिंग लाइफ'मधल्या (Dating Life) काही गोष्टींवर बोलताना तिनं हा खुलासा केला आहे. या वेळी तिनं तिच्या खासगी आयुष्यातली काही गुपितंही शेअर केली आहेत. रॉकी इमर्सन ही अडल्ट इंडस्ट्रीतली सर्वाधिक उंची असलेली महिला (The tallest woman) आहे. तिची उंची 6 फूट 3 इंच आहे. रॉकी मॉडेल आणि कॅम गर्ल म्हणूनही ओळखली जाते. 2017 पासून ती अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. रॉकीला अनेक पुरस्कारदेखील मिळालेले आहेत. रॉकीचं टॅटू कलेक्शनदेखील कायम चर्चेत असतं. रॉकी इमर्सननं नुकतेच तिच्या डेटिंग लाइफबाबत काही खुलासे केले आहेत. 'खरंतर, अनेक महिलांना उंच पुरुष अधिक आवडतात. परंतु, मला बुटके अर्थात कमी उंचीचे पुरुष फार आवडतात,' असं रॉकीनं म्हटलं आहे. हे वाचा-Sex Education | तुमच्या नीरस लैंगिक जीवनात असे भरा रंग, दोघांनाही मिळेल आनंद 'अनफिल्टर्ड' या पॉडकास्टवरून पुरस्कार विजेता पॉर्न डायरेक्टर होली रॉंडेलशी बोलताना रॉकीनं सांगितलं की, 'माझी उंची जास्त असल्यानं अडल्ट इंडस्ट्रीत करिअर सुरू करताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता; पण अडचणींवर मात करून मी यश मिळवलं.' या वेळी रॉकीनं वैयक्तिक आयुष्यातली अनेक गुपितं शेअर केली. हे वाचा-तुमची गर्लफ्रेंड किंवा बायको एकटी असताना गुगलवर काय काय सर्च करते माहितीये का? 'जेव्हा मी माझ्यापेक्षा जास्त उंची असलेल्या पुरुषांसोबत डेटिंगला जात असे, तेव्हा माझ्या मनात काहीशी भीती निर्माण व्हायची. मला उंच व्यक्तींसोबत काहीसं अस्वस्थ वाटतं. त्यामुळे मला माझ्यापेक्षा कमी उंचीच्या पुरुषांविषयी अधिक आकर्षण वाटू लागलं. मला कमी उंची असलेले पुरुष आवडू लागले', असं रॉकीनं सांगितलं. रॉकीच्या बॉयफ्रेंडची उंचीही 6 फूट आहे. यापूर्वी असणाऱ्या तिच्या एका बॉयफ्रेंडची उंची 5 फूट 7 इंच होती. रॉकीने केलेले खुलासे आणि सांगितलेली गुपितं तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरली आहेत.
First published:

पुढील बातम्या