Home /News /viral /

मेलो, वाचवा.. वाचवा…! तरुणाच्या आरोळ्यांनी मित्राला आवरेना हसू, VIDEO पाहून कळेल कारण

मेलो, वाचवा.. वाचवा…! तरुणाच्या आरोळ्यांनी मित्राला आवरेना हसू, VIDEO पाहून कळेल कारण

तो मोठ्या हौसनं रोलर कोस्टरध्ये बसला खरा, पण राईड सुरु झाल्यावर त्याचं जे काही झालं, ते पाहून भल्याभल्यांना हसू आवरेना.

    इस्लामाबाद, 21 जानेवारी: एका रोलर कोस्टरमध्ये (Roller Coaster) बसलेला आणि जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या (Shouting) तरुणाची त्याच्या मित्राला (Friend) अजिबात दया येत नव्हती. मित्राची मदत करण्याऐवजी तो खदाखदा हसत होता आणि मित्राची फजिती मोबाईलमध्ये शूट (Video) करत होता. नेमकं काय घडतंय, हे सुरुवातीचे काही क्षण अजिबात समजत नव्हतं, मात्र जसा हा व्हिडिओ काही सेकंद पुढे गेला, तसं समजत गेलं की नेमका प्रकार काय होता. रोलर कोस्टरची भीती हा व्हिडिओ पाकिस्तानमधील एका उरुसादरम्यान रेकॉर्ड झाल्याची माहिती आहे. साधारण पंचविशीच्या वयाचा एक तरुण त्याच्या मित्रासह रोलर कोस्टरमध्ये बसलेला दिसतो. राईड सुरु होण्यापूर्वीच तो प्रचंड घाबरल्याचं दिसतं. जशी राईडला सुरुवात होते, तशी त्याची आणखीनच घाबरगुंडी उडते आणि तो ओरडायला सुरुवात करतो. काही वेळात राईडचा वेग वाढतो आणि तरुणाचा स्वतःवरचा ताबा सुटतो. भितीची भावना त्याच्या मनात निर्माण होते आणि तो अक्षरशः जीवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात करतो. देवाचाही केला धावा खरं तर रोलर कोस्टरची राईड ही मजा घेण्याची गोष्ट असते. त्या वेगाचा थरार आणि आनंद लुटण्यासाठी अनेकजण अशा प्रकारच्या राईडचा आनंद घेतात. काहींना पोटात गोळा येतो, तर काहींना त्या वेगावर स्वार होत जोरजोराने ओरडत आपला आनंद साजरा करावासा वाटतो. मात्र हा तरुण त्या राईडला इतका घाबरलेला दिसतो की राईड सुरु होण्यापूर्वीपासून तो राईड थांबवण्याची सूचना करताना दिसतो. राईड सुरू झाल्यावर तर तो ईश्वाराचा धावा करू लागतो आणि आपलं आयुष्य आज संपणार, असं बडबडू लागतो. हे वाचा-डॉक्टरांची ऐतिहासिक कमाल! माणसाच्या शरीरात प्रत्यारोपित केल्या डुकराच्या किडनी मित्राने घेतली मजा त्याच्यासोबत याच राईडवर असलेला त्याचा मित्र ओरडणाऱ्या तरुणाची दृश्यं मोबाईलमध्ये कैद करतो आणि तो सोशल मीडियावर टाकतो. राईड थांबल्यानंतर शेवटी या तरुणाचं ओरडणं कमी होतं, मात्र त्याची भीती मुळीच जात नाही. हा तरुण आयुष्यात पुन्हा कधीही असल्या राईडमध्ये बसणार नाही, हे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून स्पष्टपणे जाणवतं. सध्या सोशल मीडियावर या घाबरट मित्राचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Pakistan, Viral video.

    पुढील बातम्या