मुंबई, 01 सप्टेंबर : अरेंज मॅरेज (Wedding video) असो किंवा लव्ह मॅरेज नवरा-नवरी (Bride groom video) एकमेकांना पाहण्यासाठी खूप आतूर असतात. लग्नाआधी जरी त्यांनी एकमेकांना पाहिलं असेल, एकमेकांना कितीतरी वेळा भेटले असतील, एकमेकांसोबत किती तरी वेळ घालावला असेल तर लग्नाच्या दिवशी एकमेकांना पाहण्याची उत्सुकता काही औरच असते. शिवाय एरवी जसे ते असतात त्यापेक्षा किती तरी वेगळे ते लग्नात दिसतात. त्यामुळे बहुतेकदा तर ही तीच व्यक्ती आहे का? यावरही विश्वास बसत नाही. असाच काहीसा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
लग्नात नवरदेवाने नवरीला पाहिलं आणि त्याला जणू धक्काच बसला. नवरीला पाहताच तो अगदी शॉकमध्येच गेला. नवरीच्या चेहऱ्यावरून त्याची नजरच हटेना. व्हिडीओत पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांशेजारी बसले आहे. नवरा नवरीला पाहतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. त्याची नजर तिच्यावरून हटतच नाही आहे. नवरीला पाहून तो स्तब्धच होतो. जणू नवरीचं सौंदर्य पाहून नवरदेव तिच्यावर फिदाच झाला आहे.
हे वाचा - लग्नातच भिडले नवरी-नवरदेव, फक्त केळ्यासाठी भरमंडपात जुंपली; VIDEO VIRAL
आपण तयार झाल्यानंतर आपल्या जोडीदाराने आपल्याला मन भरून पाहावं, आपल्या सौंदर्याचं कौतुक करावं, असं बहुतेक महिलांना वाटतं. असाच हा जोडीदार आपल्या लाइफ पार्टनरच्या सौंदर्याने घायाळ झाला आहे. ते त्याच्या चेहऱ्यावरील हावभावातून दिसून येत आहे.
नवरदेवाला सर्वांसमोर आपल्याकडे असं एकटक पाहताना पाहून नवरीही लाजते. लाजेने तिचा चेहरा गुलाबी होतो. ती हळूच गालात हसते.
हे वाचा - VIDEO- पाय धरून अख्खा खिसाच कापला; नवरीकडून पाया पडून घेणं नवरदेवाला पडलं महागात
@freedom_studiosss इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wedding video