मेहुणीने भावोजीसोबत भलतीच मस्करी केली. व्हिडीओत पाहू शकता, नवरदेवासमोर त्याची मेहुणी उभी आहे. तिच्यासमोर एक मिठाईची थाळी येते. मेहुणी त्यातील मिठाईचा एक तुकडा घेते आणि नवरदेवाला म्हणजे आपल्या भावोजीला भरवायला जाते. हे वाचा - VIDEO - लग्नात नवरदेवाला बसला 'जोर का झटका'; नवरीला पाहताच पुरता हादरला मिठाई भरवण्यासाठी मेहुणीचा हात पुढे होताच भावोजी ती खाण्यासाठी आपलं तोंड उघडतात. पण मेहुणी मात्र आपला तो हात लगेच मागे घेते आणि भावोजीला मिठाई भरवण्याऐवजी स्वतःच ती मिठाई खाते. भावोजीच्या तोंडाऐवजी ती मिठाईचा तुकडा आपल्याच तोंडात टाकते.मिठाई खाण्यासाठी तोंड उघडलेल्या नवरदेवाचं तोंड यावेळी पाहण्यासारखं आहे. मेहुणीने आपली सर्वांसमोर जी फजिती केली त्यामुळे त्यालाही थोडी लाज वाटते. तो आपली मान खाली घालतो पण तिचा हा खोडसरपणा पाहून त्यालाही हसू आवरत नाही. हे वाचा - लग्नातच भिडले नवरी-नवरदेव, फक्त केळ्यासाठी भरमंडपात जुंपली; VIDEO VIRAL निरंजन महापात्रा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wedding