मुंबई, 21 सप्टेंबर : तुमच्यासमोर एखाद्या बोअरवेलमध्ये किंवा छोट्याशा खड्ड्यात कुणी पडलं तर तुम्ही काय कराल फार फार तर त्याला दोरीने बाहेर काढण्याचा प्रयत्न कराल. नाहीतर प्रशासनाला कळवाल. मात्र सध्या सोशल मीडियावर
(social media) अशा तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याने एका मुक्या जीवाला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे
(Man rescue goat from borewell tiny deep pit).
खड्ड्यात पडलेल्या शेळीला वाचवण्यासाठी हा तरुण स्वतःच त्या खड्ड्यात गेला. शेळीच्या रेस्क्युचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होतो आहे. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
व्हिडीओत आपण पाहू शकतो. बोअरवेलच्या आजूबाजूला सुरुवातीला काही तरुण बसलेले आहेत. या बोअरवेलमध्ये एक शेळी पडली आहे. तिला कसं वाचवायचं याचा विचार हे सर्वजण करतात. यानंतर एक तरुण आपलं डोकं थेट या बोअरवेलमध्ये घालतो. त्यानंतर त्याचे मित्र त्याचे दोन्ही पाय पकडून त्याला बोअरवेलमध्ये सोडतात.
हे वाचा - Shocking! दोरीउड्या मारता मारता अचानक खड्डा झाला आणि...; भयंकर दुर्घटनेचा VIDEO
तरुण ज्या खड्ड्यात गेला आहे, त्या खड्ड्याचा आकार इतका लहान आहे की तरुणाच्या शरीरानेच तो व्यापला गेला आहे. त्या खड्ड्यात हवा जायलाही जागा उरली नाही आहे. आत गेल्यावरही श्वास घेणंही त्याला मुश्किल झालं असावं. तरी तो खड्ड्यात जातो.
अखेर शेळीला घेऊनच तो बाहेर येतो. त्याच्या आणि त्याच्या मित्रांच्या मदतीमुळे शेळीचा जीव वाचला. या सर्वांनी मिळून त्या शेळीला सुखरूप बोअरवेलमधून बाहेर काढलं. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्यासारखा आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झालेत.
हे वाचा - मेलो, वाचवा.. वाचवा…! तरुणाच्या आरोळ्यांनी मित्राला आवरेना हसू, VIDEO
थोडी जरी चूक झाली असती तर ती तरुणाच्या जीवावर बेतली असती. मुक्या जीवाला वाचवण्यासाठी त्याने स्वत:चा जीवही धोक्यात घातला. त्यामुळे तरुणाने जे साहस दाखवलं आहे, त्यासाठी त्याचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.