Home /News /viral /

VIDEO - Surprise म्हणत दरवाजा उघडला पण...; अशा अवस्थेत दिसले पालक की पाहताच पळाला लेक

VIDEO - Surprise म्हणत दरवाजा उघडला पण...; अशा अवस्थेत दिसले पालक की पाहताच पळाला लेक

पालकांना सरप्राईझ द्यायला गेलेल्या मुलाला दरवाजा उघडताच असं काही दिसलं की तो तिथं थांबलाच नाही.

    वॉशिंग्टन, 21 जानेवारी : आपल्याला सरप्राईझ मिळालेलं कुणाला आवडणार नाही, तर काहींना सरप्राईझ द्यायला आवडतं. अशाच एका सरप्राईझचा व्हिडीओ समोर आला आहेत. ज्यात एक लेकाने आपल्या पालकांना सरप्राईझ द्यायला गेला पण उलट त्यालाच सरप्राईझ मिळालं (Parents doing such act while son come to suprise them). त्याने आपल्य पालकांचा बेडरूमचा दरवाजा उघडला आणि त्याला त्याचे पालक अशा अवस्थेत दिसलं की तो तिथून पळालाच. 20 वर्षांचा जोसेफ पेना अमेरिकन सैन्यात जवान आहे. दोन वर्षांनी तो घरी परतला होता. आपल्याला सुट्टी मिळाली असून आपण घरी येत आहोत हे त्याने आपल्या पालकांना सांगितलं नव्हतं. त्यांना त्याला सरप्राईझ द्यायचं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायचा होता. पण आपल्यालाच इतकं मोठं सरप्राईझ मिळेल याचा विचारही त्याने केला नव्हता. त्याच्या कॅमेऱ्यात असं काही कैद झालं की शरमेने तोंड लपवण्याची वेळ आली आणि तो तिथून पळाला. हे वाचा - साप...साप...! महिलेने पोलिसांनाही बोलावलं; जे सापडलं ते पाहून लपवावं लागलं तोंड जोसेफ घरात आला, त्याने आपल्याजवळील कॅमेरा ऑन केला आणि पालकांच्या बेडरूमपर्यंत पोहोचला. दरवाजा न ठोकवताच त्याने थेट उघडला आणि सरप्राईझ ओरडत तो आत जाणार इतक्यात त्याला असं काही दिसलं की दरवाजा बंद करून तो मागेच फिरला आणि बेडरूमपासून दूर पळाला. Kenny Powers Memes युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल असं त्याच्या कॅमेऱ्यात काय कैद झालं होतं. तर ज्यावेळी जोसेफने पालकांच्या बेडरूममचा दरवाजा उघडला तेव्हा त्याची आई कॅटी आणि वडील रिचर्ड हे एकमेकांसोबत खासगी क्षण घालवत होते. त्यांचे ते संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. हे वाचा - काहीही! तरुणीने सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट; फक्त वाचूनच उलटी येईल अमेरिकन पोस्टच्या रिपोर्टनुसार आपल्या लेकाचं हे सरप्राईझ आपल्यासाठी सरप्राईझपेक्षा शरमेचा क्षण जास्त होता, असं त्याची आई म्हणाली. त्याला पाहताच मी मोठ्याने ओरडली. त्याने ही सर्व व्हिज्युअल मेमेरी डिलीट केली असावी, यावर मला विश्वास आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Viral, Viral news, Viral videos, World news

    पुढील बातम्या