मुंबई 19 ऑक्टोबर : सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ येतात. हे व्हिडीओ कधी आपलं मनोरंजन करतात, तर काही व्हिडीओ हे खरंच खूप आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या एक असंच प्रकरण समोर आलं आहे, जे खूपच धक्कादायक आहे. खरंतर गाडी चालवताना एका व्यक्तीला आपल्या दुचाकीच्या स्पीड मीटरमध्ये अशी गोष्ट दिसली, ते पाहून त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. हे प्रकरण मध्यप्रदेशातील आहे. येथे दुचाकीच्या स्पीड मीटरमध्ये या व्यक्तीला चक्क नाग दिसला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दुचाकी मीटरमध्ये काचेच्या आत हा नाग बसला होता. त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या या नागाला स्पीड मीटरवरून सुरक्षितपणे काढून जंगलात सोडण्यात आले आहे. ही घटना ज्या व्यक्तीसोबत घडली, त्या व्यक्तीचे नाव आहे नजीर. नजीर जेव्हा आपल्या बाईकवरुन कामाला जात होता. तेव्हाच सापासारखं कुणीतरी फुसफुसलं असा आवाज आला. त्याने नीट निरखून पाहिल्यावर त्याची नजर स्पीड मीटरवर पडली, ज्यानंतर तो घाबरला. हे ही पाहा : सिंहीणीच्या तावडीत अडकला, पण मृत्यूला चकमा देऊन परतला… पाहा Viral Video त्याला या मीटरमध्ये नाग दिसला, ज्यानंतर त्याने आपली गाडी हळूच रस्त्याच्या बाजूला नेऊन उभी केली. त्यानंतर तेथील लोकांनी आपल्या फोनमध्ये ही सगळी घटना कैद केली आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
#Snake : There was a stir in Barhata of Narsinghpur district of Madhya Pradesh when a serpent was seen in the speed meter of a person's bike. At present, the serpent has been safely removed from the speed meter and left in the forest. CBSE
— Anamika Singh (@Anamika20744211) October 18, 2022
#snake #ViralVideo #Diwali2022 pic.twitter.com/aD7AaGmwWW
नजीरने रात्री उशिरा आपली दुचाकी घराबाहेर उभी केली होती, त्यावेळी कदाचित नाग काचेच्या आत गेला असावा. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नजीर खान यांनी कुटुंबासह इतर लोकांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला. त्यानंतर दुचाकीच्या मीटरची काच फोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर कसातरी सापाला बाहेर काढले आणि गावापासून दूर जंगलात सोडले गेले.