मुंबई 23 ऑक्टोबर : आपल्यापैकी सगळ्यांनीच रोडने प्रवास केला असेलच. तेव्हा रस्त्याच्याकडेला लहान दगड तुम्ही पाहिलं असेलच. या दगडांवर कधी एखादा आकडा, म्हणजेच अंतर तसेच त्या भागाचे नाव लिहिलेले असते. परंतू तुम्ही कधी या दगडाला नीट पाहिलंय का? ते लहान दगडं वेगवेगळ्या रंगाचे असतात. ते सर्व एकाच रंगाचे का नाहीत? याचा प्रवासासाठी काय उपयोग? असा कधी तुम्ही विचार केलाय का? चला तर मग आज आम्ही तुम्हाला आमच्या बातमीत सांगूया की माइलस्टोनचा वेगळा रंग काय दर्शवतो. पिवळा माइलस्टोन प्रवासादरम्यान तुम्हाला एखादा पिवळा मैलाचा दगड दिसला तर समजून घ्या की तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून जात आहात. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, देशातील राष्ट्रीय महामार्गाचे जाळे 1,65,000 किमी परिसरात पसरलेले आहे. हे महामार्ग राज्य आणि शहरांना जोडतात. राष्ट्रीय महामार्ग हे असे रस्ते आहेत ज्यांची दुरुस्ती आणि देखभाल ही केंद्र सरकारच्या अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जबाबदारी आहे. हे ही वाचा : कधी विचार केलाय, ऑनलाईन डिलिव्हरी बॉक्सचा रंग तपकिरीच का असतो? यामागचं कारण फारच रंजक मात्र, आता अनेक ठिकाणी या मैलाच्या दगडांच्या जागी फलक लावले जात आहेत. पण हे दगड पूर्णपणे नष्ट झाले आहेत असे नाही. आजही मोठ्या प्रमाणात ही लहान दगडं पाहायला मिळतात. प्रवासादरम्यान जर तुम्हाला हिरवा मैलाचा दगड दिसला तर त्याचे संकेत वेगळे आहेत. या मैलाचा दगड म्हणजे तुम्ही राष्ट्रीय महामार्ग सोडून राज्य महामार्गावर पोहोचला आहात. त्यामुळे या मैलाच्या दगडांचा रंग पाहून, त्यांच्या बांधकाम आणि देखभालीची जबाबदारी कोणाची आहे हे समजू शकते. हे ही वाचा : फोन अन् इंटरनेटपासून काही काळ दूर जायचंय? मग ‘या’ तीन ठिकाणांना नक्की भेट द्या इतर रंगीत माइलस्टोन पिवळ्या आणि हिरव्या व्यतिरिक्त, काळा, पांढरा आणि निळा माइलस्टोन जर तुम्हाला दिसला, तर तेव्हा समजून घ्या की तुम्ही मोठ्या शहरात किंवा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. या रस्त्यांच्या बांधकामाची आणि देखभालीची जबाबदारी तेथील महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाची आहे. केशरी माइलस्टोन प्रवासादरम्यान तुम्हाला केशरी रंगाचे काही माइलस्टोन दिसले, तर समजून घ्या की तुम्ही एखाद्या गावातून जात आहात. हे रस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बांधण्यात आले आहेत. जवाहर रोजगार योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून गावागावात बांधण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या टप्पे वर केशरी पट्टे आहेत. सन 2000 पासून या योजनेंतर्गत गावांमध्ये रस्ते बांधले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.