मुंबई 28 डिसेंबर : सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ समोर येतात, ज्याबद्दल आपल्यासाठी विचार करणं देखील कठीण जातं. पण काही हौशी तसेच, सहासी मंडळी असतात की, जे आपल्याती साहस सिद्ध करण्यासाठी, तसेच प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो मगरीशी संबंधीत आहे. मगरींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असेल, ज्यामध्ये ते कधी शांत दिसतात, तर कधी ते त्यांच्या भक्ष्याचे तुकडे करताना दिसतात. हे ही पाहा : Video : अजगराजवळ जाण्याची चुक करुन बसली, पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून येईल पोटात गोळा त्यामुळे असे काही वन्य प्राणीही आहेत, जे मगरीसमोर यायला घाबरतात, पण नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. तसेच या मुलाच्या कृत्याला साहस म्हणावं का वेडेपणा? असा तुम्हाला प्रश्न देखील पडेल. व्हिडीओमध्ये एक लहान मूल मगरींनी भरलेल्या तलावात उडी मारताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पुढे काय घडलं हे एकदा पाहाच
— crianças fazendo merda (@criancafazendoM) November 17, 2022
या धक्कादायक व्हिडीओमध्ये एक पूल दिसत आहे, जो मगरीच्या लहान पिल्लांनी भरलेला आहे. तलावात इतक्या मगरी एकत्र आहेत, ज्यांना पाहून कोणालाही भीती वाटेल. परंतु असं असलं तरी देखील हा लहान मुलगा, त्या मगरींनी भरलेल्या पूलमध्ये उडी मारतो.
व्हिडीओत पुढे हा चिमुकला कोणत्याही भीतीशिवाय तलावात मगरींसोबत आरामात पोहताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @criancafazendoM नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. ज्यावर अनेक कमेंट्स देखील आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा फेक व्हिडीओ आहे. तर काहींनी या मुलाचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ खरा आहे की खोटा, हे अद्याप कळू शकलेलं नाही. तसेच हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे देखील समोर आलेलं नाही.