मुंबई 26 डिसेंबर : साप, नाग आणि अजगर पाळणं धोकादायक असतं. काही जण हे माहिती असूनदेखील नसतं धाडस करतात. सोशल मीडियावर साप, नाग किंवा अजगर पकडण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात; पण अशा प्रकारचे प्राणी पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षण गरजेचं असतं. अन्यथा हे धाडस जिवावर बेतू शकतं. याकडे दुर्लक्ष करून काही जण साप, नाग, किंग कोब्रा, अजगर पकडण्याचं धाडस करतात आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर करतात. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ तुम्ही देखील सोशल मीडियावर पाहिले असतील. तसाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला एका अजगराला प्रेमाने पिंजऱ्याबाहेर काढते; पण क्षणार्धात अजगर तिच्या हाताला दंश करून वेटोळं घालतो. हे ही पाहा : Video : आधी विजेच्या तारेवर चढला आणि… प्रेयसीसाठी तरुणाचं धक्कादायक पाऊल या महिलेच्या हातातून रक्त वाहू लागतं. दुसरीकडे अजगराचं वेटोळं सोडवताना या महिलेच्या सहकाऱ्याची दमछाक होत असल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे. साप, नागांपासून दूर राहणं चांगलं असं कायम सांगितलं जातं; मात्र अलीकडच्या काळात धाडस आणि फॅशनसाठी साप, नाग पाळून त्यांचं संगोपन केलं जातं. हे धाडस जीवघेणं ठरू शकतं. सध्या या संदर्भातला एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत, एका अजगराला प्रेमाने काचेच्या पेटीबाहेर काढणाऱ्या महिलेच्या हाताला अजगर दंश करतो आणि तिच्या हाताला घट्ट वेटोळं घालून बसतो. यामुळे महिलेचा हात रक्तबंबाळ होतो. महिलेच्या हाताला घातलेलं वेटोळं काढताना तिच्या सहकाऱ्याला अक्षरशः घाम फुटल्याचं दिसतं.
हा व्हिडिओ @DailyLoud नावाच्या ट्विटर हँडलवरून 24 ऑक्टोबरला शेअर करण्यात आला होता. महिला अजगराला पिंजऱ्याबाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना त्याने तिच्यावर हल्ला केला, अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज, 1 लाख 10 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि 13.7 हजार रिट्विट मिळाले आहेत. या 1.48 मिनिटाच्या व्हिडिओत, एक महिला `हाय बेबी गर्ल` असं म्हणत अजगराचा पिंजरा उघडते. पिंजरा उघडताच अजगर तिच्या दिशेने चाल करू लागतो. ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत आपला हात पुढे करते. त्या वेळी अचानक अजगर तिच्या हाताला दंश करतो आणि वेटोळं घालतो.
तत्क्षणी एक पुरुष सहकारी या महिलेजवळ पोहोचतो आणि अजगराचं वेटोळं सोडवण्याचा प्रयत्न करतो. या महिलेच्या हातातून रक्तस्राव होऊ लागतो; पण अजगर तिचा हात सोडत नाही. अजगराने अत्यंत ताकदीने महिलेचा हात घट्ट पकडून ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती तिला मदत करायची सोडून व्हिडिओ शूट करण्यात दंग असल्याचं दिसतं. अजगराचं वेटोळं सोडवताना दमछाक झाल्याचंदेखील दिसून येतं. या व्हिडिओवर शेकडो युझर्सनी कमेंट केल्या आहेत. `हाय बेबी गर्ल म्हणाली होतीस ना`? अशी प्रश्नार्थक कमेंट एका युझरने केली आहे. दुसरा एक युझर कमेंटमध्ये म्हणतो, की `या कारणामुळे साप पाळू नये.` एकूणच हा व्हिडिओ विचलित करणारा आहे.