मुंबई, 09 जुलै : प्राण्यासंबंधीत अनेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी एखाद्या सुंदर क्षणांचे असतात. तर कधी थरारक शिकारीचे. जे अंगावर काटा आणणारे असतात. आपल्याकडे एकाद्याचे प्राण घेतल्यावर शिक्षा होते. परंतू जंगलाचे नियम वेगळे आहेत. इथे एकाचं पोट भरण्यासाठी दुसऱ्याला आपले प्राण द्यावेच लागतात सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो हरीण आणि वाघाशी संबंधी आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्यवाटेल या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक वाघ आळशीपणे जंगलात झोपला आहे. तेव्हा त्याच्यासमोर शिकार आला, पण त्यानंतर त्याने जे केलं त्यावर विश्वास बसणे कठीण आहे. Wild life : चित्याची अशी स्पीड की पाहून व्हाल थक्क, Video ने नेटकऱ्यांना ही बसला धक्का वाघाच्या समोर कोणी आलं तर वाघ त्याला सोडणार नाही, हे तर आपल्याला माहित आहे. पण आळशी वागाने तसं केलं नाही, ज्यामुळे हरणाचे प्राण वाचले आहे. या व्हिडीओत खरंतर वाघ झोपला होता. तो भूकेनं अशक्त होऊन झोपला असावा असं दिसत आहे. काही वेळाने दोन मोठे हरण (सांबर) त्याच्या समोर धावत आले आणि ते वाघाला पाहताच तेथे उभे राहिले. मात्र वाघ जसा उठला तसंच हरणांनी तेथून पळ काढला. जगातील 9 असे कुत्रे जे संपवू शकतात सिंहाचाही खेळ वाघ उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत राहिला पण हरणाला पकडण्यासाठी त्याला उठवलं नाही, तो हे सगळं पाहात राहिला पण काहीही करु शकला नाही आणि पुन्हा झोपला.
या व्हिडीओमध्ये ज्या प्रकारचा नजारा पाहायला मिळला आहे, तो सहसा पाहायला मिळत नाही. जंगली प्राण्यांशी संबंधित हा व्हिडीओ big.cats.india या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. सोशल मीडिया युजर्सही यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला लाईक्स आणि व्ह्यूज देखील मिळाले आहेत.