मराठी बातम्या /बातम्या /Viral /पाहता पाहता पत्त्यांसारखा दरीत कोसळला भला मोठा ट्रक; VIDEO पाहून अंगावर काटा उभा राहिल

पाहता पाहता पत्त्यांसारखा दरीत कोसळला भला मोठा ट्रक; VIDEO पाहून अंगावर काटा उभा राहिल

पावसाचं हे जीवघेणं रुप पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पावसाचं हे जीवघेणं रुप पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पावसाचं हे जीवघेणं रुप पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हिमाचल प्रदेश, 30 जुलै : गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे देशभरात हाहाकार माजला आहे. पावसाच्या कहराचा एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला आहे. हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी जिल्ह्यात गुरुवारी एक ट्रक अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ पाहून तुम्हाला येथील परिस्थिती लक्षात येईल. हा ट्रक पलटी होत दरीत कोसळला. ट्रकमधील चालक आणि क्लिनरने यांनी उडी मारून स्वत:चा जीव वाचवला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंडी जिल्ह्यातील करसोग येथील आहे. (A big truck crashed into the valley)

कलंगार रस्त्यावर दरड कोसळली होती. दरम्यान रस्त्यावर दगड चुकविण्याचा प्रयत्न करीत असताना टायरखाली माती आल्याने ट्रक पलटी झाला. यादरम्यान ट्रक पलटी मारत एका झाडाला आदळला. यावेळी चालक आणि क्लिनरले उडी मारून स्वत:चा जीव वाचवला.

झाडाला आदळल्याच्या काही सेकंदानंतर ट्रक दरीत कोसळला. हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी डोंगरावरुन दरड कोसळल्याची घटना समोर येत आहे. रस्त्यांवर पडलेल्या दगडांपासून बचाव करण्यासाठी ट्रक चालक प्रयत्न करीत होता. मात्र माती ट्रकच्या टायरखाली आली व ट्रक घसरला. ट्रक झाडाला आदळताच चालक आणि क्लिनरने बाहेर उडी मारली. यादरम्यान रस्त्यावर उभं राहून लोक अपघाताचा व्हिडीओ शूट करीत होते. ट्रकमध्ये प्लास्टिकच्या 27 टाक्या आणि काही प्लास्टिकचे पाइप होते. पोलीस या अपघातानंतर घटनास्थळी पोहोचून अधिक तपास करीत आहे.

" isDesktop="true" id="586197" >

हिमाचल प्रदेशातून वारंवार पावसामुळे होणाऱ्या हाहाकाराच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील एका भागात पर्यटकांच्या गाडीवर दरड कोसळल्याची दुर्घटना समोर आली होती. या दुर्घटनेत तब्बल 9 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पावसाच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे.

हे ही वाचा-11पैकी दोघेच बचावले; दरड कोसळल्यानंतर Video शूट करीत तरुणाने सांगितला प्रसंग

दरम्यान या व्हिडीओमध्ये पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशातील परिस्थिती समोर येते. भलामोठा ट्रक अगदी पत्त्यांसारखा खाली घरंगळत गेल्याचं दिसून येत आहे.

 

First published:
top videos

    Tags: Accident, Himachal pradesh, Shocking viral video, Viral video.