मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! बायको-चिमुकल्यासह मृत्यूच्या दाढेत गेला बाईकचालक; 2 बसच्या मध्ये चिरडले; भयंकर अपघाताचा VIDEO

Shocking! बायको-चिमुकल्यासह मृत्यूच्या दाढेत गेला बाईकचालक; 2 बसच्या मध्ये चिरडले; भयंकर अपघाताचा VIDEO

बाईक आणि बसच्या अपघाताचं हे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं (Puducherry bike bus accident video).

बाईक आणि बसच्या अपघाताचं हे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं (Puducherry bike bus accident video).

बाईक आणि बसच्या अपघाताचं हे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं (Puducherry bike bus accident video).

  • Published by:  Priya Lad

अर्चना आर/पुदुचेरी, 25 ऑक्टोबर : अनेकदा गाडी चालवताना चालक अशा चुका करताना ज्यामुळे ते स्वतः मृत्यूच्या दाढेत जातात (Accident video). असाच एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात बाईकस्वाराने स्वतःसह बायकोचा आणि चिमुकल्याचीही जीव धोक्यात टाकला (Bike and bus accident). हे तिघंही दोन बसच्या मध्ये चिरडले. अपघाताचं हे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं (Puducherry bike bus accident video).

पुदुचेरीच्या कल्मांंडप गावात 23 ऑक्टोबरला हा भयंकर अपघात झाला (Puducherry couple trapped between two buses). एक बाईकस्वार आपल्या पत्नी आणि मुलासह जात होता. त्याच्या पुढे एक बस होती. त्या बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात तो पुढे गेला. पण समोरून दुसरी बस आली आणि दोन्ही बसच्या मध्ये तिघंही चिरडले.

सुदैवाने दोन्ही बसचालकांनी तात्काळ बस थांबवली आणि काही लोक या लोकांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. इतका भयंकर अपघात होऊनही ते बचावले आहेत. अपघाताचं हे दृश्य बसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं.

हे वाचा - बाबो! गाडीएवढी उंची नाही अन् चिमुकल्याने एका चाकावर सुसाट पळवली बाईक; पाहा VIDEO

पद्दुचेरी वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनसार, हा बाईकस्वार मुलगा गाडीवर असतानाही भरधाव गाडी चालवण्याची चूक केली. सुदैवाने बसचालकाने प्रसंगावधान राखलं आणि बसला तात्काळ ब्रेक मारला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली.  बसवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अपघात आणि चोरीच्या घटनाचा तपास करण्यात बरीच मदत होते. त्यामुळे आम्ही सर्व खासगी आणि सरकारी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश दिले.

हे वाचा - रस्त्यावर सुसाट धावत सुटला चिमुकला, भरधाव वेगाने कार आली आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

गेल्या महिन्यात गुजरातमध्येही असंच एक कुटुंब भयंकर अपघातातून बचावलं होतं. एकीकडे खड्डे आणि दुसरीकडे पावसामुळे साचलेलं पाणी अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत एक दुचाकीस्वार एक महिला आणि छोट्या बाळाला घेऊन दुचाकीवरून चालला होता. त्याच्या डाव्या बाजूने एक ट्रॅक्टर पास होत होता, तर उजव्या बाजूला पावसाचं पाणी साचलं होतं. या दोन्हीच्या मधून बाईक नेत असताना अचानक गाडी स्लिप झाली.

ट्रॅक्टरच्या मागच्या चाकापाशी आल्यानंतर बाईक घसरली आणि बाईकचालक, महिला आणि लहान बाळ तिघेही ट्रॅक्टरखाली पडले. मात्र त्याचवेळी पडता पडता ही गाडी फिरल्यामुळे महिला आणि बाळ हे ट्रॅक्टरपासून काहीसे दूर ओढले गेले. त्यांच्या अंगावर ट्रॅक्टरचे चाक आले नाही. सर्वात पुढे आणि ट्रॅक्टरच्या जवळ असणाऱ्या दुचाकी चालकाच्या मात्र डोक्यावरून आणि मानेवरून ट्रॅक्टरचं मागचं चाक गेलं. हा व्हिडिओ पाहत असताना जेव्हा ट्रॅक्टरचं चाक बाईकसस्वाराच्या डोक्यावरून जातं, त्यावेळी या घटनेत त्याचा मृत्यू निश्चित झाला असावा, असंच सुरुवातीला वाटतं. मात्र हा चमत्कार म्हणायचा की नशीब, असा प्रश्न त्यानंतरची दृश्यं पाहिल्यावर पडतो.

हे वाचा - डोळ्यादेखत चिमुकल्या लेकावरून गेली कार; ओरडत धावत आले बाबा पण...; अंगावर काटा आणणारा VIDEO

डोक्यावरून बाईकचं चाक जाऊनदेखील हा दुचाकीस्वार उठून उभा राहिला. अर्थात, या दुचाकीस्वारानं हेल्मेट घातलं होतं. मात्र ट्रॅक्टरखाली पडल्या पडल्या हे हेल्मेट त्याच्या डोक्यातून निघाल्याचंही व्हिडिओत दिसतं. त्यामुळे हेल्मेट नसतानाही डोक्यावरून ट्रॅक्टरचं चाक जाऊन हा माणूस कसा वाचला, असा प्रश्न सर्वांनाच पडला.

First published:

Tags: Accident, Bike accident, Puducherry, Viral, Viral videos