नवी दिल्ली 27 ऑगस्ट : आजकाल चोरही चोरी करण्यासाठी नवनव्या पद्धतींचा अवलंब करतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. व्हिडिओमध्ये चोर अगदी बिनदास्त चोरी करताना दिसत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीचा व्हिडिओ मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) आहे. यात दुचाकीवरील दोन चोर स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेची साखळी ओढून (Chain Snatching) घेतात आणि तिथून फरार होतात. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. VIDEO - आता केक कापणार नाही तर…; बर्थडेवरून भडकलेल्या GF ने BF ला दिली धमकी मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ग्वालियरमधील आहे. यात स्कूटीवर एक महिला आणि तिचा मुलगा कुठेतरी जात होते. इतक्यात दोन दुचाकीवरील दोन व्यक्ती स्कूटीवर जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करू लागतात. नंतर संधी मिळताच ते महिलेची साखळी ओढण्याचा प्रयत्न करतात. यादरम्यान महिला साखळी वाचवण्याचा प्रयत्न करते मात्र इतक्यात दुसरा व्यक्ती हातात पिस्तुल घेऊन साखळी तिच्याकडून ओढून घेतो. चोराचा दुसरी साथीदार गाडी सुरू करून छठेवतो. या घटनेनंतर दोन्ही चोर तिथून फरार होतात. या घटनेनंतर महिला आणि तिचा मुलगी पुरते घाबरले आहेत.
कुत्र्याला पाहताच काकांनी बायकोसह पळवली सायकल; शॉकिंग आहे या VIDEO चा शेवट या घटनेच्या वेळी रस्त्यावरुन इतरही गाड्या जाता येताना दिसत आहेत. मात्र, चोर अशा गर्दीच्या ठिकाणीही चोरी करत आहेत. यामुळे मध्य प्रदेशातील व्यवस्थेची पोलखोल करणारी ही घटना ठरत आहे. या घटनेबाबत बोलताना मध्य प्रदेशच्या ग्वालियर येथील पदव पोलीस स्टेशनचे टाउन इन्सपेक्टर विवेक अस्थाना म्हणाले, की आमच्याकडे संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आहे. लवकरच आम्ही अज्ञात सोनसाखळी चोरांना अटक करू.