मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - आता केक कापणार नाही तर...; बर्थडेवरून भडकलेल्या गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला दिली धमकी

VIDEO - आता केक कापणार नाही तर...; बर्थडेवरून भडकलेल्या गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला दिली धमकी

गर्लफ्रेंडची बॉयफ्रेंडला तंबी.

गर्लफ्रेंडची बॉयफ्रेंडला तंबी.

बर्थडे प्लॅनिंगवरून गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला चांगलंच झापलं आहे.

    मुंबई, 27 ऑगस्ट : बहुतेक महिलांना सरप्राइझ (Surprise) खूप आवडतात. लग्न, बर्थडे (Birthday surprise) यादिवशी आपल्या जोडीदाराने (Partner) आपल्यालास खास गिफ्ट (Birthday gift) द्यावं, काहीतरी सॉलिड प्लॅन करावा, अशी अपेक्षा त्यांची असते. पण पार्टनरने (Boyfriend) तिच्या (Girlfriend) मनासारखं काही केलं नाही तर नेमकं काय होतं, असाच एक मजेशीर (Funny video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. तरुणी आपल्या वाढदिवसावरून (Girlfriend angry on boyfriend) खूप चिडलेली आहे. बॉयफ्रेंडने तिच्यासाठी काही खास प्लॅन केला नाही (Couple video), अशी तक्रार ती करत असते आणि याआधी जसं बर्थडे सेलिब्रेशन झालं तसं बर्थडे सेलिब्रेशन मला आता नको नाहीतर... अशी धमकीच तिने आपल्या बॉयफ्रेंडला दिली आहे. व्हिडीओत फक्त तरुणीचा चेहरा दिसतो आहे. तिचा बॉयफ्रेंड तिच्यासमोर बसला आहे, त्याचा चेहरा दिसत नाही पण त्याचा आवाज ऐकू येतो आहे. हे वाचा - ...अन् लग्नातच नवरीने चोपलं; मंडप सोडून नवरदेवाने ठोकली धूम; नेमकं काय घडलं पाहा तरुणी उदास देते आहे. तिचा चेहरा रडवेला झाला आहे. आपल्या बॉयफ्रेंडने आतापर्यंत आपल्या बर्थडेसाठी काहीच खास केलं नाही, याचं दुःख तिला आहे. आधीच्या बर्थडे प्लॅनिंगचा सर्व राग ती त्याच्यावर काढते. बॉयफ्रेंड तिला काय करू असं विचारतो. तेसुद्धा ती सांगत नाही, म्हणजे सर्व मीच सांगायचं का? मी तुझ्या बर्थडेसाठी जे काही करते ते तुला विचारून करते का? असंच ती त्याला विचारते. बराच वेळ त्यांचा असा वाद सुरू असतो. शेवटी ती बॉयफ्रेंडला धमकी देते. या बर्थडेला तून काही प्लॅन केलं नाहीस तर मी केक कापणार नाही. केक तुझ्या तोंडावरच फेकणार, असंच तिने बॉयफ्रेंडला बजावून ठेवलं. हे वाचा - बॉयफ्रेंडच्या भरवशावर तिने झाडावरून उडी मारली आणि...; काय झाला शेवट पाहा VIDEO @ximpatientwolf ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहीमना तरुणीचं इमोशनल बोलणं आवडलं आहे, तर काही जणांनी तरुणीने बॉयफ्रेंडवर असा दबाव टाकणं ठिक नसल्याचं म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Boyfriend, Couple, Funny video, Girlfriend, Relationship, Viral, Viral videos

    पुढील बातम्या