मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सोनाराच्या दुकानात चोरी करत होतं कपल पण...; कुत्र्यानं शिकवला धडा, पाहा Shocking Video

सोनाराच्या दुकानात चोरी करत होतं कपल पण...; कुत्र्यानं शिकवला धडा, पाहा Shocking Video

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या (Social Media Viral) अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनं दुकानदाराच्या सतर्कतेचं कौतुक केलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या (Social Media Viral) अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनं दुकानदाराच्या सतर्कतेचं कौतुक केलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या (Social Media Viral) अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनं दुकानदाराच्या सतर्कतेचं कौतुक केलं आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 08 ऑक्टोबर : चोरीच्या अनेक विचित्र घटना (Weird Theft Incidents) अनेकदा पाहायला मिळतात. अनेकदा या घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाल्यानं व्हायरल होतात. आता असाच एक आणखी एक व्हिडिओ (Theft Video) समोर आला आहे. यात दिसतं, की एक कपल अगदी सुंदर पद्धतीनं तयार होऊन सोनाराच्या दुकानात गेलं आहे. हे कपल तिथे चोरी करण्याचा प्रयत्न करतं. मात्र, यात ते अपयशी ठरतात आणि शेवटी कुत्रा त्यांच्यावर हल्ला करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या (Social Media Viral) अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनं दुकानदाराच्या सतर्कतेचं कौतुक केलं आहे. याचा स्वॅगच वेगळा! रिक्षा दोन चाकांवर चालवत पोहोचला गिनीज बूकमध्ये; पाहा VIDEO व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हे कपल सोनाराच्या दुकानात जातं. यातील पुरुष सूटाबूटात दिसला तर महिलेनं गाउन घातलेला होता. आपल्या आउटफिटला सूट होणारा मेकअप तिनं केला होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता, की सोनारच्या दुकानात जात हे दोघंही वेगवेगळे दागिने बघतात. दोघंही दुकानात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या हातात एक रिकामा गिफ्टचा बॉक्स असतो. काही वेळात पुरुष दुकानदाराला बोलण्यात गुंतवतो आणि महिला रिकामा बॉक्स उचलून बाजूला ठेवते.
काही वेळानंतर दोघंही असं नाटक करतात की दुकानात त्यांना काहीच आवडलं नाही. त्यामुळे आता ते बाहेर पडण्याच्या तयारीत असतात. जेव्हा ते बाहेर पडू लागतात तेव्हा महिला गिफ्ट बॉक्ससोबत सोन्याचा हारही उचलते आणि पुढे जाते. मात्र, यादरम्यान एक मजेशीर घटना घडते. ही महिला जेव्हा बॉक्सहीत हार उचलते तेव्हा ती याकडे लक्ष देत नाही की या हारासोबत एक दोरी बांधललेली आहे. यामुळे महिला पुढे निघताच दुकानदाराला समजतं, की हे दोघंही चोरी करण्यासाठी आले आहेत. हजामत पाहूनच फुटला घाम; जीव मुठीत धरून सलूनमधून पळाला तरुण; VIDEO VIRAL शेवटी महिला तिच्यासोबत असलेल्या पुरुषाच्या हातात हा बॉक्स देते आणि तिथून पळ काढते. यानंतर दुकानात असलेला कुत्रा या व्यक्तीवर हल्ला करतो. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. अनेकांनी दुकानदारानं लढवलेली शक्कल पाहून त्याचं कौतुक केलं आहे.
First published:

Tags: Shocking video viral, Theft

पुढील बातम्या