जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / याचा तर स्वॅगच वेगळा! तीन चाकांची रिक्षा दोन चाकांवर चालवत पोहोचला गिनीज बूक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये; पाहा VIDEO

याचा तर स्वॅगच वेगळा! तीन चाकांची रिक्षा दोन चाकांवर चालवत पोहोचला गिनीज बूक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये; पाहा VIDEO

याचा तर स्वॅगच वेगळा! तीन चाकांची रिक्षा दोन चाकांवर चालवत पोहोचला गिनीज बूक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये; पाहा VIDEO

अनेक भारतीयांनी असे जगावेगळे काही अनोखे विक्रम नोंदवले आहेत. हे विक्रम पाहून तुम्ही थक्क व्हाल.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये (Guinness Book of World Records) अनेक विक्रम नोंदवले जातात. त्यापैकी काही जगावेगळे आणि एकमेवाद्वितीय असतात. अनेक भारतीयांनी असे जगावेगळे काही अनोखे विक्रम नोंदवले आहेत. हे विक्रम पाहून तुम्ही थक्क व्हाल. आपल्या आजूबाजूला अनेक प्रतिभावान लोक आहेत. यातील काही जण असे पराक्रम करून दाखवतात, जे पाहून सगळेच चकित होतात. असाच एक अद्भुत व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिडिओमधील (video) या व्यक्तीने गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एक विक्रम नोंदवला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आपल्या इन्स्टाग्राम पेजवर अनोखे पराक्रम करून वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या लोकांचे व्हिडिओ पोस्ट करते. हा व्हिडिओही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने शेअर केला आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही नाईन हिंदी’ नं दिलं आहे. गिनीज बुकने सध्या त्यांच्या पेजवरून शेअर केलेला हा व्हिडिओ जुना आहे. पण हा व्हिडिओ पुन्हा लोकप्रिय होत आहे. चेन्नईच्या (Chennai) जगतीश मणी (Jagatish Mani) नावाच्या रिक्षा ड्रायव्हरचा हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच तोंडात बोटं घालाल. जगतीश मणीने आपली रिक्षा (rickshaw) दोन चाकांवर चालवली आहे. ती पण तब्बल 2.2 किमी अंतर. जगतीशच्या ह्या अनोख्या ड्रायव्हिंगची दखल गिनीज बुकने घेतलीय. दोन चाकांवर रिक्षा चालवण्याच्या त्याच्या या पराक्रमाने वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. हे वाचा - बाबो! कासव लय भारी! जंगलात पाणी पिणाऱ्या सिंहालाही लावलं पळवून; पाहा भन्नाट VIDEO गिनीज बुकने जगतीशचा हा 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, एपिक ऑटो-रिक्षा साइड व्हीली. चेन्नई, भारत येथील रिक्षाचालक जगतीश एम.मणी यांच्याकडे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. जगतीशचा आश्चर्यकारक पराक्रम या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो.

    जाहिरात

    व्हिडिओमध्ये जगतीश मणी तीन नव्हे तर दोन चाकांवर पिवळ्या रंगाची ऑटो रिक्षा चालवत असल्याचं पहायला मिळतं. तसं पाहिलं तर अनेक लोक आपली रिक्षा दोन चाकांवर चालवतात. पण त्यांना लांब अंतरासाठी हे जमत नाही. जगतीशने मात्र 2.2 किलोमीटर रिक्षा दोन चाकांवर रिक्षा चालवून आपल्या अनोख्या कलेचं प्रदर्शन केलं. त्याचा हा स्टंट पाहून लोक आश्चर्यचकीत झाले. दोन चाकांवर पूर्ण रिक्षेचा तोल सांभाळून धरण्याचं आणि वेगात रिक्षा चालवण्याचं जगतीशचं कसब जबरदस्त आहे. गिनीज बुकनेही त्याच्या या कलेची वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद करून सन्मान केला आहे. गिनीज बुकने हा व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करताच तो वेगाने व्हायरल झाला. हा व्हिडीओ आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात