मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हजामत पाहूनच फुटला घाम; जीव मुठीत धरून सलूनमधून पळाला तरुण; VIDEO VIRAL

हजामत पाहूनच फुटला घाम; जीव मुठीत धरून सलूनमधून पळाला तरुण; VIDEO VIRAL

अशी हजामत तुम्हीसुद्धा कधीच पाहिली नसेल.

अशी हजामत तुम्हीसुद्धा कधीच पाहिली नसेल.

अशी हजामत तुम्हीसुद्धा कधीच पाहिली नसेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 08 ऑक्टोबर : एखादं काम एक असलं तरी ते करण्याची प्रत्येकाची पद्धत मात्र वेगवेगळी असते. अगदी सलूनमध्येही (Saloon) तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक हेअर स्टायलिस्ट्ससुद्धा  हेअर कटिंग (Hair cutting) करण्याची एक वेगळी, अनोखी शैली असते. त्यामुळे शक्यतो त्या एका विशिष्ट हेअर स्टालिस्टकडूनच आपण केस कापून (Hair cutting video) घेतो. पण प्रत्येक वेळी हा अनुभव आनंददायी असेल असा नाही, काही वेळा तो भीतीदायकसुद्धा ठरू शकतो (Funny saloon video). असाच एक व्हिडीओ (Viral video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.

सलूनमध्ये केस कापायला गेलेला तरुण सलूनमध्ये इतका घाबरला की तो जीव मुठीत धरून सलूनमधून पळतच सुटला. केस कापायला गेलेल्या या तरुणाने सलूनमधील केस कापायची पद्धत पाहिली आणि त्याला घामच फुटला. मागचा पुढचा कोणताच विचार न करता तो केस न कापताच सलूनमधून पळाला.

हे वाचा - शिकार करायला आला आणि कॅमेरा पाहताच दिली पोझ; वाघाचा VIDEO पाहून म्हणाल So cute

व्हिडीओत पाहू शकता एका सलूनमध्ये दोन व्यक्ती दोन वेगवेगळ्या खुर्चीवर बसल्या आहेत. एका खुर्चीवरील तरुणाच्या केसांवर फोम लावण्यात आला आहे आणि त्याच्यासमोर उभा असलेला तरुण जो कदाचित हेअर स्टायलिस्ट आहे तो या तरुणाच्या डोक्यावर चपलेने मारतो आहेत. जणू काही चपलेनेच हजामत करत आहे.

शेजारी बसलेला तरुण हे सर्व पाहतो. तोसुद्धा केस कापण्यासाठीच आला आहे. त्याच तयारीत तो तिथं बसतो. पण जेव्हा अशी विचित्र हजामत पाहतो तेव्हा मात्र त्याला घामच फुटतो. तो तसाच खुर्चीतून उठतो आणि पळू लागतो. पळता पळता त्याचा तोल जातो आणि तो तिथं पडतोसुद्धा. पण पुन्हा उठून तो तिथून धूमच ठोकतो. ऑफिशिअल व्हायरलक्लिप्स इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

हे वाचा - मित्राची मजा अन् नवरदेवाला सजा, वरातीत बँड वाजला; नेमकं काय झालं पाहा VIDEO

याआधीसुद्धा सलूनमधील असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात सलूनमध्ये दाढी करणाऱ्या व्यक्तीने तरुणासोबत असा प्रँक केला, ज्यामुळे तो तरुण जागीच बेशुद्ध झाला.

View this post on Instagram

A post shared by @jatt._.landd

व्हिडीओत पाहू शकता एक तरुण दाढी करण्यासाठी सलूनमध्ये खुर्चीत बसला आहे.  तरुणाचे डोळे बंद असल्याने बार्बर आधीच त्याच्या मानेवर आणि हनुवटीवर लाल रंगाचं लिक्विड टाकतो, जसं काय ते रक्तच असावं असं वाटतं. त्यानंतर बार्बर त्याची दाढी करायला घेतो आणि लगेच तो त्याची हनुवटी धरून ओरडायला लागतो. तेव्हा तो तरुणही घाबरत उठतो. तो स्वतःला आरशात पाहतो तर काय त्याच्या हनुवटीजवळून भळाभळा रक्त वाहत असतो. जे पाहून त्याला धक्काच बसतो. रक्त पाहून तो तिथंच बेशुद्ध होतो.

First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos