मुंबई 03 फेब्रुवारी : विविध प्रकारच्या गुन्हेगारांबद्दल तुम्ही वर्तमानपत्रे, सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनेल्सवर पाहिले किंवा वाचले असेल. लोक अशा काही युक्त्या लावून गुन्हे करतात की त्याबद्दल माहिती काढायला पोलिसांनाही घाम फुटतो. काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार पोलिसांसमोर आला, ज्याबद्दल जाणून त्यांना ही आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी या प्रकरणाला डॉपेलगँगर मर्डर केस असे नाव दिले आहे. हे प्रकरण नावाप्रमाणेच गुंतागुंतीचे आहे. यामध्ये एका मुलीने आत्महत्येचा कट रचला आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वांनीच याबाबत चर्चा सुरू केली. हे ही पाहा : Viral : ‘या’ चोराला कुठे शोधायचं पोलिसांना प्रश्न ? CCTV मध्ये चोर तर दिसला पण… काय आहे डॉपेलगँगर खून प्रकरणाचे संपूर्ण प्रकरण? हे विचित्र प्रकरण आहे जर्मनीतील जिथे एका मुलीने स्वत:च्याच मृत्यूचा प्लान आखला. तिने स्वत:च्या मृत्यूची कहाणी खरी ठरवण्यासाठी एक खून देखील केला. या मुलीने आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या सारखी दिसणाऱ्या एका तरुणीचा शोध घेतला आणि मग तिला भेटायला बोलवलं आणि तिची हत्या केली. रिपोर्ट्सनुसार, या आरोपीसारख्या दिसणाऱ्या मुलीवर तिने चाकूने 50 वेळा हल्ला केला. हत्या करणाऱ्या तरुणीचे नाव शहरबान आहे. आरोपी शहरबानने खून केल्यानंतर त्या तरुणीचा मृतदेह तिच्या कारमध्ये ठेवला, तिथे पोलिसांना तिचा मृतदेह सापडला, त्यानंतर कारच्या नंबर प्लेटवरून पोलिसांनी हा मृतदेह शहरबानचा असल्याचे सांगितले, परंतु पोस्टमॉर्टमनंतर आणि डीएनए चाचणी केल्यानंतर पोलिसांना खऱ्या मुलीची माहिती मिळाली. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हे सर्व शाहरबाननेच केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शाहरबानला शोधलं. शाहरबानला या प्रकाराबद्दल विचारले असता तिने सांगितले की तिला तिच्या प्रियकरासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचे होते. यामुळे त्यांनी तिच्या मृत्यूचा कट रचला. माहितीनुसार शाहरबानला कौटुंबिक वादामुळे लपून राहायचे होते. तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहाता यावं म्हणून तिने हे सगळं केलं. तपासकर्त्यांच्या मते, हा खून पूर्वनियोजित होता; ज्यामध्ये मुलीने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्यासारख्या दिसणाऱ्या अनेक मुलींना मेसेज केले होते. अनेक तरुणींना भेटायला बोलावले. परंतु बहुतेक लोकांनी नकार दिला. गेल्या वर्षी ऑगस्टच्या सुरुवातीला ती इंस्टाग्रामवर ब्युटीशियन खादिदजा एमला भेटली होती. ती शाहरबानला भेटायला तयार झाली, तेव्हा तिने हा प्लान आखला.
खदिजा आणि शाहराबान यांच्यात अनेक साम्य असल्याचे समोर आली. परंतू पोलिसांनी या दोन्ही तरुणी वेगळ्या असल्याचे शोधून काढले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी शहाराबान आणि तिचा बॉयफ्रेंड शाकीर यांना पकडले, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.