मराठी बातम्या /बातम्या /Viral /मित्रांसोबत गप्पा मारत असतानाच खिशातील मोबाईलमधून निघू लागला धूर अन्..., स्फोटाचा थरारक VIDEO

मित्रांसोबत गप्पा मारत असतानाच खिशातील मोबाईलमधून निघू लागला धूर अन्..., स्फोटाचा थरारक VIDEO

व्हायरल होणारा हा 15 सेकंदाचा व्हिडिओ (Viral Video) व्यवस्थित पाहिला तर समजतं, की पांढऱ्या शर्टमध्ये दुकानदाराच्या समोर बसलेल्या व्यक्तीच्या शर्टच्या खिशातून अचानक धूर निघू लागतो.

व्हायरल होणारा हा 15 सेकंदाचा व्हिडिओ (Viral Video) व्यवस्थित पाहिला तर समजतं, की पांढऱ्या शर्टमध्ये दुकानदाराच्या समोर बसलेल्या व्यक्तीच्या शर्टच्या खिशातून अचानक धूर निघू लागतो.

व्हायरल होणारा हा 15 सेकंदाचा व्हिडिओ (Viral Video) व्यवस्थित पाहिला तर समजतं, की पांढऱ्या शर्टमध्ये दुकानदाराच्या समोर बसलेल्या व्यक्तीच्या शर्टच्या खिशातून अचानक धूर निघू लागतो.

नवी दिल्ली 06 सप्टेंबर : मोबाईल (Mobile) शर्टच्या खिशामध्ये न ठेवण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. याचं कारण हे आहे की मोबाईलच्या रेडिएशनमुळे आपल्या हृदयालाही नुकसान पोहोचू शकतं. इतकंच नाही तर ईअरफोनशिवाय (Earphone) बराच वेळ फोनवर बोलल्यामुळेही आपल्या आरोग्यावर याचे परिणाम होत असतात. याच कारणामुळे आरोग्य तज्ज्ञ मोबाईल वापरताना अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देतात. सध्या सोशल (Social Media) मीडियावर मोबाईलचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Mobile Blast) होत आहे. यात दिसतं, की एक व्यक्ती दुकानात बसला आहे आणि इतक्यात त्याच्या फोनमधून धूर येऊ लागतो.

चक्क कुत्र्यानं वाचवला माशाचा जीव; हा VIRAL VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती मोबाईल शॉपमध्ये बसूनच आपल्या मित्रांसोबत बोलत आहे. त्याच्या आसपासही काही लोक उभा आहेत. हसत खेळत गप्पा मारणाऱ्या या व्यक्तीला समजतच नाही की काहीच सेकंदात त्याच्यासोबत काय घडणार आहे. व्हायरल होणारा हा 15 सेकंदाचा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर समजतं, की पांढऱ्या शर्टमध्ये दुकानदाराच्या समोर बसलेल्या व्यक्तीच्या शर्टच्या खिशातून अचानक धूर निघू लागतो.

...अन् 20 फूट अजगरानं तीन वेळा केला हल्ला; हादरवून टाकणारा Video आला समोर

मोबाईलमधून अचानक धूर निघू लागल्याचं दिसताच या व्यक्तीची अवस्था खराब होते आणि तो लगेचच खिशातील मोबाईल जमिनीवर फेरतो. इतकंच नाही तर या व्यक्तीशेजारी असलेला दुसरा युवकही प्रचंड घाबरतो आणि दुकानातून लगेचच बाहेर पडतो. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शननुसार, काहीच वेळात बाहेर फेकलेल्या या मोबाईलचा ब्लास्ट झाला. फेसबुकवर हा व्हिडिओ दहयू माळीनं शेअर केला आहे. हा व्हिडिओ 64 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. तर, अनेकांना हा व्हिडिओ लाईक केला असून यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

First published:
top videos