जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शेजाऱ्याच्या चुकीमुळे मोठी दुर्घटना; क्षणात जमीनदोस्त झाली 3 मजली इमारत, Shocking Video

शेजाऱ्याच्या चुकीमुळे मोठी दुर्घटना; क्षणात जमीनदोस्त झाली 3 मजली इमारत, Shocking Video

शेजाऱ्याच्या चुकीमुळे मोठी दुर्घटना; क्षणात जमीनदोस्त झाली 3 मजली इमारत, Shocking Video

व्हिडिओमध्ये दिसतं, की एका तीन मजली घराच्या बाजूला असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये काहीतरी खोदकाम चाललं आहे. मात्र, याच दरम्यान एक मोठी दुर्घटना घडते

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 19 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत काही ना काही व्हायरल होत राहतं. अनेकदा इथे अशा काही गोष्टी व्हायरल होतात ज्या अनेकांना काहीतरी शिकवून जातात. सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. व्हिडिओमध्ये दिसतं, की एका तीन मजली घराच्या बाजूला असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये काहीतरी खोदकाम चाललं आहे. मात्र, याच दरम्यान एक मोठी दुर्घटना घडते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Building Collapse Video) होत आहे. भारतातील रहस्यमयी ‘बर्म्युडा ट्रँगल’; इथे जाणारा व्यक्ती कधीच परत का येत नाही? व्हिडिओमध्ये दिसतं, की एका घराच्या शेजारीच एक रिकामा प्लॉट आहे. याठिकाणी काहीतरी काम सुरू आहे. यासाठी खोदकाम सुरू आहे. यामुळे हादऱ्यानं शेजारी असलेलं तीन मजली घर क्षणातच जमीनदोस्त होतं. या घराच्या शेजारच्याच जमिनीवर पायासाठी उत्खनन करण्यात आलं. मात्र, काही वेळातच या उत्खननामुळे शेजारच्या तीन मजली घराचा पाया खराब झाला आणि तो हळूहळू कोसळू लागला.

जाहिरात

घर पडू लागताच लोक त्या तीन इमारतीतून बाहेर पडू लागले. यानंतर जवळपासची दुकानेही रिकामी करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु घराचं प्रचंड नुकसान झालं असून काहीही शिल्लक राहिलं नाही. घर कोसळतानाचा व्हिडिओ तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 70 वर्षीय आजीची नातवासोबत मस्ती; चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी फिदा, VIDEO इन्स्टाग्रामवर giedde नावाच्या एका यूजरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, की जर तुमच्या दुकानाच्या आसपास खाली प्लॉट असेल आणि त्यात खोदकाम सुरू असेल तर त्याला विरोध करणं आहे ते काम थांबवणं हा तुमचा हक्क आहे. यामुळे तुमच्या प्रॉपर्टीचं मोठं नुकसान होऊ शकतं. हा व्हिडिओ आतापर्यंत 20 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर, 4 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात