Home /News /national /

भारतातील रहस्यमयी ‘बर्म्युडा ट्रँगल’; इथे जाणारा व्यक्ती कधीच परत का येत नाही?

भारतातील रहस्यमयी ‘बर्म्युडा ट्रँगल’; इथे जाणारा व्यक्ती कधीच परत का येत नाही?

या तळ्यामध्ये गेलेली एकही व्यक्ती तेथून परतलेली नाही. त्यामुळेच या तळ्याला ‘लेक ऑफ नो रिटर्न’ असं (Lake of no return) नाव पडलं आहे

नवी दिल्ली 19 सप्टेंबर : बर्म्युडा ट्रँगल (Bermuda triangle) या रहस्यमयी जागेविषयी जवळपास आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे. या ठिकाणी गेलेली कोणतीही वस्तू परत येत नाही, असं या त्रिकोणाबाबत म्हटलं जातं. बर्म्युडा भागात समुद्रामध्ये असलेला हा भाग कायमच चर्चेचा विषय आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का, की भारताच्या सीमेवरही (Indian Bermuda triangle) असाच एक ‘बर्म्युडा ट्रँगल’ आहे? आज आम्ही तुम्हाला याच भागाबाबत माहिती देणार आहोत. भारत-म्यानमारच्या सीमेवर नौंग यांग (Naung Yang lake) नावाचं एक तळं आहे. या तळ्यामध्ये गेलेली एकही व्यक्ती तेथून परतलेली नाही. त्यामुळेच या तळ्याला ‘लेक ऑफ नो रिटर्न’ असं (Lake of no return) नाव पडलं आहे. हे तळं अर्ध अरुणाचल प्रदेशामध्ये, आणि अर्ध म्यानमारच्या एका शहरामध्ये आहे. 1.8 किलोमीटर लांब आणि 0.4 मीटर रुंद असं हे तळं स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतं आहे. 70 वर्षीय आजीची नातवासोबत मस्ती; चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी फिदा, VIDEO या तळ्याशी संबंधित एक कथा अगदीच प्रसिद्ध आहे. इंडिया टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये याचा उल्लेख आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात (Lake of no return story) या तळ्यामध्ये कित्येक विमानं उतरली होती. या सर्व विमानांमधील सैनिक आणि कर्मचारी याच ठिकाणी मरण पावले. या अर्बन लेजंड सोबतच, या तळ्याची स्थानिक दंतकथाही आहे. ही दंतकथाही (Arunachal Pradesh mysterious lake) इंडिया टाईम्सच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. कोणे एके काळी, या तळ्याशेजारी असणाऱ्या गावकऱ्यांनी तळ्यातील मोठा मासा पकडला होता. हा मासा एवढा मोठा होता, की गावातील जवळपास सर्वांना तो खाण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. याला अपवाद होता तो फक्त एक म्हातारी आणि तिच्या नातीचा. यामुळेच, तलावाच्या देवतेने नाराज होऊन या आजी आणि नातीला वगळता संपूर्ण गावाला तळ्यात बुडवून टाकलं. साधारणपणे अशाच आशयाच्या आणखी तीन कथा या तळ्याबाबत सांगितल्या जातात. विद्यार्थीनीचे केस कापणं शिक्षिकेला पडलं महागात; पालकांनी मागितली 7 कोटी भरपाई आणखी एका कथेमध्येही दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख आहे. यात असं म्हटलं आहे, की यादरम्यान जपानचे काही सैनिक वाट चुकून या तळ्यापर्यंत आले आणि तिथेच त्यांना मलेरिया होऊन त्यांचा मृत्यू झाला. यासोबतच, एका लेखकाने असंही म्हटलं आहे, की इस्रायलच्या 10 लुप्त झालेल्या आदिवासी प्रजातींपैकी (Israel tribe hidden at Myanmar) एका प्रजातीच्या कागदपत्रांमध्ये या तलावाचा उल्लेख आढळतो. या लेखकाने असा दावाही केला आहे, की या प्रजातीचे लोक अजूनही या तळ्याच्या परिसरात लपून राहतात. कित्येक लोक असंही मानतात की या सगळ्या कथा केवळ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पेरल्या गेल्या आहेत. या तलावाशेजारील आणि एकूणच अरुणाचल प्रदेशमधील पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी या अफवा पसरवण्यात आल्या असल्याचंही म्हटलं जातं. अर्थात, हे सगळं खरं जरी असेल, तरीही या कथा रोमांचक आहेत हे नक्की! त्यामुळे तुम्हाला अशा रहस्यमयी जागांविषयी आकर्षण असेल, तर आपल्या जवळच्याच या बर्म्युडा ट्रँगलला नक्कीच भेट द्या!
First published:

Tags: Public place, Viral news

पुढील बातम्या