जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 70 वर्षीय आजीची नातवासोबत मस्ती; चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी फिदा, VIDEO

70 वर्षीय आजीची नातवासोबत मस्ती; चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी फिदा, VIDEO

70 वर्षीय आजीची नातवासोबत मस्ती; चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी फिदा, VIDEO

आजी आणि नाताची ही जोडी अनेकदा बॉलिवूडच्या प्रसिद्ध गाण्यांवर डान्स करत व्हिडिओ (Dance Video) शेअर करताना दिसते. इन्स्टाग्रामवर त्यांचे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 19 सप्टेंबर : आजी आणि नातू यांची केमिस्ट्री सर्वांच्याच पसंतीस उतरते.. दोघांचे व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) अपलोड होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक 70 वर्षाची आजीबाई आपल्या 18 वर्षाच्या नातासोबत एका हिट सॉन्गवर (Hit Song) हावभाव देताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. विद्यार्थीनीचे केस कापणं शिक्षिकेला पडलं महागात; पालकांनी मागितली 7 कोटी भरपाई आजी आणि नाताची ही जोडी अनेकदा बॉलिवूडच्या प्रसिद्ध गाण्यांवर डान्स करत व्हिडिओ (Dance Video) शेअर करताना दिसते. इन्स्टाग्रामवर त्यांचे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. सध्या समोर आलेल्या नव्या व्हिडिओमध्ये हे दोघंही अतिशय सुंदर एक्सप्रेशन देताना दिसत आहेत. यात आजीबाई नेहाचे बोल गाताना दिसत आहे तर त्यांचा नातू टोनी कक्कडचे बोल गात आहे. हा व्हिडिओ त्यांनी विनोदी पद्धतीनं बनवला आहे.

जाहिरात

टिकटॉक जरीही बंद झालं असलं तरीही या नातू आणि आजीच्या जोडीनं आपल्या फॅन्सचं मनोरंजन करणं सुरुच ठेवलं. यूट्यूबपासून इन्स्टाग्राम आणि फेसबुकपर्यंत प्रत्येक लोकप्रिय अॅपवर आजी आणि नाताची ही जोडी धुमाकूळ घालते. काही वेळातच हा सामान्य बिहारी मुलगा सोशल मीडियावर स्टार झाला. सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओदेखील आतापर्यंत जवळपास 2 लाख लोकांनी लाईक केला आहे. तर, अनेक यूजर्सनं या व्हिडिओवर कमेंट करत आपली प्रतिक्रियाही दिली आहे. पृथ्वीवरची अशी जागा जिकडे पायलट विमान न्यायला घाबरतात, खूपच भीतीदायक असतो अनुभव एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की खूप सुंदर हावभाव. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, जितका सुंदर तुमचा डान्स आहे, तितक्याच सुंदर तुम्हीही आहात. आणखी एकानं लिहिलं, की आजी आणि नातू यांची ही जोडी अतिशय खास आहे. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात