नवी दिल्ली 15 सप्टेंबर : अनेकदा असं म्हटलं जातं, की महिलांच्या वजनावर (Women’s Weight) कधीच काही बोलू नये. खरं पाहिलं तर हे महिला आणि पुरुष दोघांच्या बाबतही लागू आहे. मात्र, घरातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्याच्या नादात महिला बऱ्याचदा स्वतःकडे लक्ष देणंच विसरतात आणि यामुळे त्यांचं वजनही वाढतं. मात्र, नुकतंच एका फोटोग्राफरनं हिच चूक एका मॉडेलचं फोटोशूट (Model Photoshoot) करताना केली. फोटोग्राफरनं या मॉडेलला तिच्या वजनावरुन (Photographer Comments on Weight of Model) असं काही म्हटलं की तिला राग अनावर झाला. यानंतर तिनं फोटोग्राफरला चांगलीच अद्दल घडवली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे.
VIDEO - डान्सिंग आजीने पुन्हा दाखवला आपला जलवा; नातीसोबत केला Cutiepie dance
बेल्जियम (Belgium) येथील रहिवासी असलेली 22 वर्षीय मॉडेल लिजे (Lize Dzjabrailova) हिनं नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती एका फोटोग्राफरला सडेतोड उत्तर देताना दिसते. लिजे हिला एका कपड्याच्या ब्रँडनं फोटोशूटसाठी अप्रोच केलं होतं. तिनं सांगितलं, की कंपनीला तिच्या साईजबाबत माहिती होतं. लिजे या फोटोशूटसाठी खूप उत्साही होती. मात्र, जेव्हा ती फोटोशूट करण्यासाठी पोहोचली तेव्हा फोटोग्राफरनं तिच्या वजनावर टीका करत म्हटलं, की या फोटोशूटनंतर पुढचं फोटोशूट दोन आठवड्यांनंतर आहे. त्यामुळे तू दोन आठवडे काही खाल्लं नाहीस तर त्या फोटोशूटपर्यंत तुझं वजन कमी होईल आणि बॉडी शेपमध्ये येईल.
View this post on Instagram
'मिल्क शेक मॅगी'चा इंटरनेटवर धुमाकूळ; पाहा नेमकी काय आहे भानगड
फोटोग्राफरचे हे शब्द ऐकून लिजेला राग अनावर झाला. तिनं या फोटोग्राफरला लगेचच सडेतोड उत्तर दिलं. लिजेनं म्हटलं, की जर त्यानं हेच एखाद्या अशा मॉडेलला म्हटलं असतं, जी आपल्या शरीराबाबत इन्सिक्यूर आहे, तर ती डिप्रेशनमध्ये गेली असती आणि तिनं खरंच जेवण सोडून दिलं असतं. त्यामुळे तिला ईटिंग डिसऑर्डर झालं असतं. लिजेच्या एका फ्रेंडनं या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि लिजेनं तो सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हापासूनच हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेनंतर कंपनीनं तिला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र तिनं काहीही ऐकलं नाही. यानंतर कंपनीनं या फोटोग्राफरलाच नोकरीवरुन काढून टाकलं. सोशल मीडियावर अनेकजण लिजेला सपोर्ट करताना दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.