• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मृत पिल्लाला सोंडेत घेऊन फिरताना दिसली हत्तीण; VIDEO पाहून पाणावतील डोळे

मृत पिल्लाला सोंडेत घेऊन फिरताना दिसली हत्तीण; VIDEO पाहून पाणावतील डोळे

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. यात एक हत्तीण आपल्या पिल्लाचा मृतदेह घेऊन फिरताना दिसत आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 15 सप्टेंबर : जगातील प्रत्येक आईचं आपल्या मुलावर जीवापाड प्रेम (Mother Love) असतं. अनेकदा आईच्या प्रेमाची उदाहरणं अगदी जंगलातील दुनियेतही पाहायला मिळतात. या घटना याचाच प्रत्यय गेतात की प्राण्यांनाही (Animals) माणसांप्रमाणेच भावना असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. यात एक मादा हत्तीण आपल्या पिल्लाचा मृतदेह घेऊन फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील. फोटोग्राफरनं केलेली ती कमेंट ऐकून भडकली मॉडेल; सर्वांसमोरच घडवली अद्दल, VIDEO सोशल मीडियावर पोस्ट केला गेलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक हत्ती आपल्या लहान बाळाला सोंडेत घेऊन फिरत आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की एक हत्तीण आपल्या मृत बाळाला घेऊन जाताना. हत्तींमध्ये आपल्या पिल्लाचा मृतदेह अशा पद्धतीनं घेऊन जाणं म्हणजे शोक व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे. अनेकदा प्राणी आपल्या पिल्लाच्या मृत्यूनंतर अशा प्रकारे आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावरील हा फोटो पाहून लोकही भावुक झाले. यानंतर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका यूजरनं म्हटलं, की माणूस असू किंवा प्राणी सर्वांची आपल्या बाळांसाठी समान भावना असते. आणखी एका यूजरनं म्हटलं, की माणूस अनेकदा प्राण्यांना चुकीचं समजतो मात्र यामागे त्यांचं दुःख आणि वेदना असतात. 40 वर्ष जंगलात राहिला, शहरात आल्यावर 8 वर्षात मृत्यू, 'रियल' टारझनची शोकांतिका! सोशल मीडियावर हा व्हिडिओ @ScienceIsNew नं शेअर केला आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून हत्तीणीचं दुःख पाहावलं गेलं नाही आणि ते निराश झाले. अनेकदा इंटरनेटवर असे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात, ज्यात प्राणी आपल्या पिल्लांवर अगदी माणसांप्रमाणेच प्रेम करताना दिसतात. सध्या हा व्हिडिओ लोकांना भावुक करत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: